Join us

soil erosion जमिनीची धूप होण्याची कारणे कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 4:15 PM

एक इंच माती तयार होण्यासाठी १०० वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो. याशिवाय याच थरात पिकास लागणारी अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असते, वारा व पाऊस यांच्यामुळे मातीच्या कणांचे एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होणे ह्या क्रियेला जमिनीची धूप असे म्हणतात.

माती ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. एक इंच माती तयार होण्यासाठी १०० वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो. याशिवाय याच थरात पिकास लागणारी अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असते, वारा व पाऊस यांच्यामुळे मातीच्या कणांचे एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होणे ह्या क्रियेला जमिनीची धूप असे म्हणतात. जमिनीची धूप होण्यासाठी माणूस मोठया प्रमाणात जबाबदार आहे, कारण माणसाने जगलांची बेसुमार तोड केली, गवताळ जमिनी कमी झाल्या, जमिनीची सदोष मशागत पध्दती आणि जमिनीची उत्पादकता टिकवून न ठेवणे तसेच सदोष पीक उत्पादन पध्दती इत्यादी कारणांनी जमिनीची मोठया प्रमाणात धूप झाली आहे.

महाराष्ट्रात धूप आणि वृक्षतोडीमुळे निकृष्ठ झालेली जमीन जवळ जवळ ४२.५% आहे. दरवर्षी मातीची धूप होण्याचे सरासरी प्रमाण प्रति हेक्टरी १० टन आहे. त्यामुळे धरणे किंवा तलावात पाण्याद्वारे जमा होणारी माती १०% तर समुद्रात वाहून जाणारी माती २९% व राहीलेली ६१ % माती एका जागेवरून दुसऱ्या जागी विस्थापीत होते. ज्या जमिनीवर गवत झाडी वगैरे दाटपणे उगवलेले, वाढलेले असते तिथे माती वाहून जाण्याचे प्रमाण उघडया जमिनीच्या मातीच्या मानाने बरेच कमी असते. जमिनीची धूप होण्याच्या क्रियेची गती तशी पाहिली तर मंद असते. ती सहसा कळून येत नाही. पण हे नुकसान फार मोठे असते हे कालांतराने कळून येते. पण अति तिव्रतेच्या पावसात जमिनीची धूप प्रचंड होवून जमीन नापिक होतात.

जमिनीची धूप, झीज ही एक नैसर्गिक भुगर्भ शास्त्रीय क्रिया असून ती सतत चालू असते व ती कमी करणे मानवाच्या हातात आहे. मनुष्य जातीच्या असाधारण क्रियांमुळे केली जाणारी जमिनीची नासधुस ही सर्वात जास्त विशेष काळजी निर्माण करते. म्हणून मनुष्य स्वत:च त्याचे नियंत्रण करू शकेल. जमिनीची धूप, झीज वा नुकसान यांना लगाम घातला न गेल्यास त्या माणसाला दारिद्रयाकडे नेतील आणि देशाच्या उत्पादनावर आणि संबधिताच्या आर्थिक परिस्थितीवरही त्याचे दुरगामी परिणाम होतील.

जमिनीची धूप होण्याची कारणे

१)जमिनीच्या नैसर्गिक संरक्षणाचा नाशजमिनीतील नैसर्गिक संरक्षणाचा नाश खालील कारणांमुळे होतो.- झाडांची बेपर्वाईने तोड करणे.- जंगले जाळून फस्त करणे.- अतिशय बेपर्वाइने गवत चारणे.गवताळ रानांचा आगीने नाश करणे.

अधिक वाचा: soil erosion जमिनीची धुप होण्याचे विविध प्रकार त्यामुळे होणारे दुष्परिणाम

२) जमिनीचा कसून दुरूपयोग करणेजमीन कसण्याबद्दल वाद नाही पण कसलेल्या जमिनीला भूसंधारणाच्या दृष्टीने न पाहता दुर्लक्ष केल्यास जमिनीची धूप होते, प्रामुख्याने यात खालील गोष्टीचा समावेश होतो.- उताराच्या दिशेने (वरून खाली) जमिनीची मशागत करणे.- धुपीला प्रोत्साहन देणारी, धुपीला अनुकूल अशी पिके सतत घेणे.- एकाच प्रकारची दर वर्षी पिके घेणे, खोल मुळांची पिके अथवा उथळ मुंळाची सतत पिके घेतल्यास त्या थरातील सेंद्रिय व वनस्पतिंना उपयुक्त अशा अन्नांशाचा नाश होतो.- चुकीच्या हानीकारक बागायती शेती पध्दतीचा अवलंब करणे

३) धुपेमुळे होणाऱ्या हानीचे अज्ञानजमिनीवर एक इंच थर तयार होण्यास शेकडो वर्षे लागतात पण तोच थर वाहून जाण्यास मात्र हजारो मिनिटेच पूरतात याचे ज्ञान शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे. या ज्ञानाच्या अभावी व इतरही कारणामुळे शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही.- यासाठी संबधित कृषि अधिकारी व कृषि विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी याबद्दलचा सविस्तर अहवाल शेतकऱ्यांसमोर ठेवणे गरजेचे आहे.- कृषि व कृषि अभियंता यांचा सल्ला घेऊनच भू संधारण योजना तयार करणे गरजेचे आहे.

डॉ अनिल दुरगुडे (मृदशास्त्रज्ञ, मृदविज्ञान विभाग, म.फु.कृ. वि. राहुरी)डॉ. संतोष काळे (शास्त्रज्ञ, अर्ध शुष्क उष्ण कटिबंधांसाठी आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था, हैदराबाद)

टॅग्स :शेतकरीशेतीपीकपाऊसहवामान