Join us

पिकांतील कीड व रोग नियंत्रणासाठी टॉप फाइव मित्र बुरशी कोणत्या? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 12:41 PM

बुरशी म्हटले की नुकसान म्हणजे पिकांची नासाडी हे चित्र आपल्या समोर दिसतं. परंतु काही बुरशी या आपल्या फायद्याच्या असतात. आपल्या मातीत बुरशीच्या अनेक प्रजाती आढळतात, यात दोन प्रकारच्या बुरशी असतात.

बुरशी म्हटले की नुकसान म्हणजे पिकांची नासाडी हे चित्र आपल्या समोर दिसतं. परंतु काही बुरशी या आपल्या फायद्याच्या असतात. आपल्या मातीत बुरशीच्या अनेक प्रजाती आढळतात, यात दोन प्रकारच्या बुरशी असतात.

त्यात एक म्हणजे (शत्रू बुरशी) ही हानिकारक असते तर काही प्रजाती फायद्याच्या (मित्र बुरशी) देखील असतात. ह्या बुरशी बहुतेकवेळा सेंद्रिय अवशेषांवर आढळते. म्हणूनच,जमिनीत बुरशीचे माध्यमातून होणाऱ्या अनेक प्रकारच्या पिकाच्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी हे एक महत्त्वपूर्ण बुरशी आहे.

१) मेटॅरायझियमह्या बुरशीला ग्रीन मस्कार्डीन बुरशी असेही म्हणतात. ही बुरशी मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, बोंडअळी, हुमणी इत्यादी किडीच्या अंगावर वाढते व त्या किडींना नष्ट करते. फवारणीकरीता ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारणीकरीता वापर करता येतो.

२) बिव्हेरीयाया बुरशीला व्हाईट मस्कार्डीन बुरशी असेही म्हणतात. हा रोग बोंडअळी, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, खोडकीडा, विविध भुंग इत्यादी किडीच्या अंगावर बुरशी वाढुन पांढऱ्या रंगाची पावडर तयार होते या किडीचा नाश होतो. यालाच व्हाईट मस्कार्डीन असे म्हणतात.

३) नोम्युरीयाया बुरशीमुळे पंतगवर्गीय, बोंडअळी, उंटअळी, पाने खाणारी अळी या किडीवर बुरशी वाढून ग्रिन मस्कार्डीन हा रोग होऊन किडीचे नियंत्रण होते.

४) व्हर्टिसीलीयमरस शोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणाकरीता या बुरशीचा वापर करतात. ही बुरशी मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, पाने खाणारी अळी इत्यादी किडीच्या अंगावर वाढुन किडींना रोगग्रस्त करुन किड नियंत्रण होते.

५) ट्रायकोडर्माही बुरशी जमीनीमधुन होणाऱ्या रोगाच्या नियंत्रणाकरीता अतिशय उपयुक्त असुन जमीनीत असणाऱ्या अपायकारक बुरशींना मारण्याचे काम करते. तसेच बिजप्रक्रिया करण्याकरीता ह्या बुरशीचा उपयोग होतो. बायोमॉस कुजविण्याच्या प्रक्रियेत ह्या बुरशीचा उपयोग डिकंपोझर म्हणुनही करता येतो.

टॅग्स :शेतीशेतकरीकीड व रोग नियंत्रणपीकपीक व्यवस्थापन