Join us

शेतकऱ्यांनो कर्ज मिळणार की नाही, हे नेमके कशावरून ठरते?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 1:43 PM

बँका आणि वित्तीय संस्था आधी तुमचा सिबिल स्कोअर तपासून घेतात. स्कोअर कमी असेल, तर कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. ५ गोष्टी लक्षात ठेवा; सिबिल स्कोअर करा चांगला.

तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असल्यास बँका आणि वित्तीय संस्था आधी तुमचा सिबिल स्कोअर तपासून घेतात. स्कोअर कमी असेल, तर कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. प्रसंगी कर्ज नाकारलेही जाऊ शकते. वित्तीय क्षेत्रात नोकरी करण्यासाठीही आता सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. कारण अनेक कंपन्या उमेदवाराचा सिबिल स्कोअर तपासतात. आपला सिबिल स्कोअर चांगला कसा ठेवावा, याची माहिती घेऊ या.

सिबिल बद्दल ठळक मुद्दे- सिबिल स्कोअर हा ३०० ते ९००च्या आतील आकडा असतो.- सिबिलच्या रिपोर्टमध्ये एखाद्याची संपूर्ण आर्थिक कुंडलीच असते.- तुमच्या आर्थिक व्यवहाराचा संपूर्ण इतिहास त्यात असतो.- किमान एकदा कर्ज घेणे आवश्यक.- १८ ते ३६ महिन्यांत सिबिल स्कोअर तयार होतो.

काय सांगतो सिबिल स्कोर?३०० ते ३५० आर्थिक पत कमजोर५५० ते ६५० सरासरी६५० ते ७५० उत्तम७५० ते ९०० सर्वोत्तमसिबिल स्कोर ६५०च्या वर असल्यास बँका कर्ज देण्यास तयार होतात. 

सिबिल म्हणजे काय?सिबिल हे क्रेडीट इंफॉर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेडचे लघुरूप आहे. हि रिजर्व्ह बँकेला माहिती देणाऱ्या कंपन्यापैकी एक कंपनी आहे. याशिवाय भारतात विक्स एक्सपेरियन आणि सीएफआय हायमार्क या कंपन्याही क्रेडिटबाबत माहिती देतात.

सिबिल स्कोअर हे आवश्यक१) वेळेत भरा ईएमआय: कर्ज घेतले असल्यास त्याचे हसे (ईएमआय) नियमित भरा.२) क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या: क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही, तर सिबिल स्कोअर कमी होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या व बिल वेळेवर अदा करा.३) झेपेल तेवढेच कर्ज घ्या: आवाक्याबाहेर जास्तीचे कर्ज घेऊन हप्ते वाढवून घेऊ नका.४) वारंवार सिबिल स्कोअर तपासू नका: मोबाइल अॅपद्वारे आता सिबिल स्कोअर पाहता येतो. पण वारंवार सिबिल स्कोअर तपासू नका. कारण त्यामुळे सिबिल स्कोअर कमी होतो.५) सामाईक खात्यापासून राहा सावध: सामाईक खाते (जॉइंट अकाउंट) उघडण्याचे टाळा. कारण तुमच्या सहकाऱ्याने कर्ज घेऊन थकविल्यास तुमचा सिबिल स्कोअरही बाधित होऊ शकतो. याशिवाय कर्जाला जामीन राहताना काळजी घ्या. कारण थकीत कर्जाच्या जामीनदाराचा सिबिलही खराब होतो.

टॅग्स :बँकपैसाशेतकरीभारतीय रिझर्व्ह बँक