Lokmat Agro >स्मार्ट शेती > रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीवर नक्की काय परिणाम होतो? वाचा सविस्तर

रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीवर नक्की काय परिणाम होतो? वाचा सविस्तर

What exactly does excessive use of chemical fertilizers affect the soil? Read in detail | रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीवर नक्की काय परिणाम होतो? वाचा सविस्तर

रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीवर नक्की काय परिणाम होतो? वाचा सविस्तर

रासायनिक खते शेतीत उत्पादन वाढविण्याचे एक प्रभावी साधन म्हणून वापरली जातात. मात्र या खतांचा अतिवापर जमिनीच्या आरोग्यावर आणि पर्यावरणाच्या संतुलनावर गंभीर परिणाम करतो.

रासायनिक खते शेतीत उत्पादन वाढविण्याचे एक प्रभावी साधन म्हणून वापरली जातात. मात्र या खतांचा अतिवापर जमिनीच्या आरोग्यावर आणि पर्यावरणाच्या संतुलनावर गंभीर परिणाम करतो.

शेअर :

Join us
Join usNext

रासायनिक खतेशेतीत उत्पादन वाढविण्याचे एक प्रभावी साधन म्हणून वापरली जातात. मात्र या खतांचा अतिवापर जमिनीच्या आरोग्यावर आणि पर्यावरणाच्या संतुलनावर गंभीर परिणाम करतो.

रासायनिक खतांच्या अतिवाराचे दुष्परिणाम

  • अल्पकालीन फायदा जरी दिसत असला तरी, दीर्घकाळात या रासायनिक खतांमुळे मातीची उत्पादकता, पोषणमूल्य, आणि पर्यावरणीय स्थिरता यांवर घातक परिणाम होतो.
  • रासायनिक खतांचा वारंवार वापर जमिनीच्या नैसर्गिक सुपीकतेवर वाईट प्रभाव करतो. यामुळे मातीतील जैविक घटक, जसे की सेंद्रिय पदार्थ, सूक्ष्मजीव, आणि गांडुळ यांची संख्या कमी होते. परिणामी, जमिनीची जैविक गुणवत्ता कमी होते आणि पोषणद्रव्येही नष्ट होतात.
  • खतांमधील रासायनिक घटक सूक्ष्मजीवांना हानी पोहोचवतात, ज्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन आणि पोषणमूल्यांची पुनर्रचना मंदावते.
  • रासायनिक खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, आणि पोटॅशियम (NPK) सारखी महत्त्वाची पोषणद्रव्ये असतात, जी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. पण यांचा जास्त वापर केल्यास मातीतील सूक्ष्मजीवांवर वाईट परिणाम होतो.
  • सूक्ष्मजीव मातीतील पोषक द्रव्यांचे विघटन करून पिकांसाठी उपलब्ध करतात. रासायनिक घटकांमुळे सूक्ष्मजीवांचे कार्य कमी होते. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची संरचना खराब होते.
  • मातीतील गाळ, वाळू, आणि चिकणमातीचे प्रमाण बिघडते, ज्यामुळे मातीची जलधारणा क्षमता कमी होते. हे मुळांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या मातीतील हवेशीरतेवर देखील परिणाम करते. यामुळे मातीची पाण्याची साठवण क्षमता कमी होते.
  • रासायनिक खतांचा दीर्घकाळ वापर मातीच्या सामू वर परिणाम करतो. काही रासायनिक खते मातीची आम्लता वाढवतात, ज्यामुळे मातीचा सामू कमी होतो (माती आम्लीय बनते). यामुळे पिकांच्या पोषणासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्त्वांची उपलब्धता कमी होते.
  • काही खते जमीन अल्कधर्मीय बनवतात, ज्यामुळे पोषक तत्त्वांचा समतोल बिघडतो. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे सुरुवातीला उत्पादन वाढते, पण नंतर मातीची उत्पादकता कमी होत जाते. शिवाय, पिकांमधील पोषणमूल्य घटते, ज्याचा परिणाम अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता यावर होतो.
  • रासायनिक खतांमुळे जैवविविधता कमी होते. मातीतील सूक्ष्मजीव, गांडूळ, आणि कीटक यांवरही रासायनिक घटकांचा वाईट परिणाम होतो. या सजीवांमुळे मातीचा पोत राखला जातो आणि जमिनीची उत्पादनक्षमता वाढत असते. जर हे सजीव नष्ट झाले, तर मातीची उत्पादकता कमी होते आणि जैवविविधतेचा ऱ्हास होतो. 

अधिक वाचा: Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे सोपे उपाय; वाचा सविस्तर

Web Title: What exactly does excessive use of chemical fertilizers affect the soil? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.