Join us

जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2023 10:09 AM

रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला मालमत्ता बक्षीस रुपाने देताना भविष्यात वाद उद्भवू नयेत, यासाठी कायदेशीररीत्या बक्षीसपत्र तयार करून देणे महत्त्वाचे असते.

रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला मालमत्ता बक्षीस रुपाने देताना भविष्यात वाद उद्भवू नयेत, यासाठी कायदेशीररीत्या बक्षीसपत्र तयार करून देणे महत्त्वाचे असते. यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते. मालमत्तेची किंमत आणि स्थानानुसार ही रक्कम बदलते. शुल्क भरल्यानंतर भेट पत्राची नोंदणी स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयात करणे आवश्यक आहे. नोंदणी दस्तऐवजाला कायदेशीर वैधता प्रदान करते.

जमीन बक्षीसपत्र म्हणजे काय?रक्ताच्या नात्यात मालमत्तेचे व्यवहार करताना भविष्यातील वाद टाळण्यासाठी बक्षीसपत्राची कायदेशीर प्रक्रिया केली जाते.

मुद्रांक शुल्क किती? त्या मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार मुद्रांक शुल्क ३ टक्के आकारले जाते. पत्नी, मुलगा, मुलगी अथवा नातवंडे या रक्तातील नात्यात मुद्रांक शुल्कात सवलत मिळते

रजिस्ट्री करताना काय काळजी घ्याल?मालमत्ता बक्षीसपत्र करताना त्याची रजिस्ट्री दुय्यम निबंधक कार्यालयात केली जाते. आई-वडील मुलांना देत असलेल्या बक्षीसपत्राच्या दस्तात भविष्यात ही मिळकत त्यांच्या संमतीशिवाय मुलांनी विकू नये, असे नमूद केले जाते.

ह्यासाठी कुणाच्या आणि किती सह्या आवश्यक हे बक्षीसपत्र कायदेशीररीत्या ग्राह्य धरले जात असल्याने बक्षीसपत्र करताना चांगल्या वर्तणुकीच्या दोन साक्षीदारांच्या सह्या या बक्षीसपत्रावर घेतल्या जातात.

देणारे, घेणारे उपस्थित राहणे अनिवार्यबक्षीसपत्र करणारा आणि ज्याच्या नावे बक्षीसपत्र करावयाचे तो, अशा दोन्ही व्यक्ती बक्षीसपत्र करताना दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

जमीन, घर, फ्लॅट, आदी मालमत्ता जवळच्या नात्यातील व्यक्तीला द्यायची असल्यास भविष्यात होणारे वाद टाळण्यासाठी अधिकृत कागदपत्रे केली जातात. त्यालाच बक्षीसपत्र म्हणतात. - भूषण भाटकर, दुय्यम निबंधक कार्यालय

टॅग्स :शेतकरीसरकारकुलसचिव