Lokmat Agro >स्मार्ट शेती > सोयाबीन, तूर, मका पिकांवर या किडींचा धोका त्यांना वेळीच रोका

सोयाबीन, तूर, मका पिकांवर या किडींचा धोका त्यांना वेळीच रोका

what is the solution for prevent the pest in soybean, tur, maize crops timely | सोयाबीन, तूर, मका पिकांवर या किडींचा धोका त्यांना वेळीच रोका

सोयाबीन, तूर, मका पिकांवर या किडींचा धोका त्यांना वेळीच रोका

राज्यात खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकावर प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने व्यवस्थापनेच्या उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना निश्चित फायदा होणार आहे.

राज्यात खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकावर प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने व्यवस्थापनेच्या उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना निश्चित फायदा होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकावर प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने व्यवस्थापनेच्या उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना निश्चित फायदा होणार आहे.

तूर
- तूर पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- तूर पिकात शेंगा पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मीटर अंतरावर शेतात उभारावेत.

सोयबीन
- सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत.

मका
- मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरानट्रानीलीप्रोल १८.५ टक्के एस. सी ०.४ मिली प्रती लीटर पाणी किंवा
- स्पीनोटोराम ११.७ टक्के एस. सी ०.५ मिली प्रती लीटर पाणी किंवा
- इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के एस. जी ०.४ ग्राम प्रती लीटर पाणी वापरून फवारणी करावी.

भुईमुग 
- भुईमुग पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींच्या फ्लुबेन्डामाइड नियंत्रणासाठी ३.५ टक्के हेक्साकोनॅझोल ५ टक्के डब्ल्यूजी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भात
- भात पिकावर काही ठिकाणी तपकिरी तुडतुडे आणि हिरवे तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
- प्रादुर्भाव दिसून येताच फिप्रोनिल ५ टक्के एस. सी. २० मि. ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी.
- शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी 'टी' आकाराचे पक्षी थांबे उभारावेत.

Web Title: what is the solution for prevent the pest in soybean, tur, maize crops timely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.