Join us

सोयाबीन, तूर, मका पिकांवर या किडींचा धोका त्यांना वेळीच रोका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 10:12 AM

राज्यात खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकावर प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने व्यवस्थापनेच्या उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना निश्चित फायदा होणार आहे.

राज्यात खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकावर प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने व्यवस्थापनेच्या उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना निश्चित फायदा होणार आहे.

तूर- तूर पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.- तूर पिकात शेंगा पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मीटर अंतरावर शेतात उभारावेत.

सोयबीन- सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत.

मका- मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरानट्रानीलीप्रोल १८.५ टक्के एस. सी ०.४ मिली प्रती लीटर पाणी किंवा- स्पीनोटोराम ११.७ टक्के एस. सी ०.५ मिली प्रती लीटर पाणी किंवा- इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के एस. जी ०.४ ग्राम प्रती लीटर पाणी वापरून फवारणी करावी.

भुईमुग - भुईमुग पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींच्या फ्लुबेन्डामाइड नियंत्रणासाठी ३.५ टक्के हेक्साकोनॅझोल ५ टक्के डब्ल्यूजी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भात- भात पिकावर काही ठिकाणी तपकिरी तुडतुडे आणि हिरवे तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.- प्रादुर्भाव दिसून येताच फिप्रोनिल ५ टक्के एस. सी. २० मि. ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी.- शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी 'टी' आकाराचे पक्षी थांबे उभारावेत.

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणखरीपशेतकरीशेतीमकाभातसोयाबीनतूर