कृषी यांत्रिकीकरणामध्ये मळणी Thresher यंत्र हे एक प्रमुख यंत्र आहे. पिक काढणी नंतर मळणीसाठी याचा वापर केला जातो. मळणी यंत्र खरेदी करत असाल तर त्याची रचना माहित असणे आवश्यक आहे.
तसेच त्याचा वापर कसा करावा आणि बऱ्याच वेळा मळणी यंत्र वापरताना अपघात होतात त्यात मळणी यंत्र सुरु असताना त्यात हात जाणे तसेच यात कधी कधी जीव गमवावा लागतो.
यासाठी मळणी यंत्र वापरताना मळणी यंत्र मालक व शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी या विषयी आपण महिती पाहणार आहोत.
मळणी यंत्र वापरताना काय काळजी घ्यावी
१) सुरक्षित मळणी करण्यासाठी ISI मार्क असलेलेच मळणी यंत्र वापरावे.
२) पिकाची मळणी करण्यापूर्वी पूर्णपणे वाळलेले असावे.
३) पिक मळणीची जागा राहत्या घरापासून दूर व समतोल असावी.
४) रात्री मळणी करतांना योग्य प्रमाणात उजेड असेल तरच मळणी करावी.
५) मळणी यंत्राची दिशा अशा प्रकारे ठेवावी कि बाहेर पडणारा भुसा व वाऱ्याची दिशा एकच राहिल.
६) सर्व नटबोल्ट व्यवस्थित घट्ट बसवावे.
७) यंत्रामध्ये पिकाची टाकणी एकसारखी व एकप्रमाणात असावी.
८) यंत्राच्या जाळ्यांची वरचेवर पाहणी करावी व स्वच्छ कराव्यात.
९) ८-१० तासानंतर मळणी यंत्रास थोडी विश्रांती द्यावी.
१०) मळणी सुरु करण्यापूर्वी यंत्र मोकळे चालवून यंत्राचा कोणता भाग घासत नसल्याची खात्री करुन घ्यावी, असल्यास निर्मात्याने दिलेल्या शिफारशीनुसार बदल करावे.
११) मळणी करतांना सैल कपडे घालू नये.
१२) मळणी यंत्रात पिक टाकतांना चालकाने हात सुरक्षित अंतरावर ठेवावे.
१३) चालकाने मद्यपान केलेले नसावे किंवा त्या ठिकाणी धुम्रपान करु नये, तसेच जवळ पाणी व वाळु ठेवावी कारण कधी कधी आग लागण्याची शक्यता असते.
१४) सामन्यत: BIS ने प्रमाणित केलेले सुरक्षित फिडींग वापरावे.
१५) बेअरिंग किंवा वळणाऱ्या पार्टला वंगण द्यावे तसेच बेल्ट तणाव चेक करावा.