Lokmat Agro >स्मार्ट शेती > कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागली आहेत काय कराल उपाय

कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागली आहेत काय कराल उपाय

What to do if the plants in the cotton field are suddenly drying up on the spot | कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागली आहेत काय कराल उपाय

कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागली आहेत काय कराल उपाय

Kapus Mar Rog बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.

Kapus Mar Rog बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.

शेअर :

Join us
Join usNext

बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.

कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात.

सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते.

आकस्मिक मर व्यवस्थापन
१) अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा.
२) वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
३) लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया + १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००:००:५० खत) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली याप्रमाणे आळवणी करावी. किंवा १ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.
४) वरीलप्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.

वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.

डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत श्री.एम.बी.मांडगे
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

०२४५२-२२९०००

Web Title: What to do if the plants in the cotton field are suddenly drying up on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.