Lokmat Agro >स्मार्ट शेती > खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा?

खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा?

When and how to use water soluble fertilizers to reduce costs on fertilizers? | खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा?

खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा?

विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात.

विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात.

शेअर :

Join us
Join usNext

विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेत देण्याकरीता अधिक फायदेशीर आहेत.

विद्राव्य खते फवारणीद्वारे देत असताना स्टीकर्स वापरणे फायद्याचे असते. बाजारामध्ये वेगवेगळी खतांची ग्रेड उपलब्ध आहेत. त्या- त्या अवस्थेमध्ये ती ग्रेड फवारल्यास उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळी खतांच्या ग्रेडची निवड करून त्यांची पिकांवर फवारणी करावी.

विद्राव्य खतांचे महत्व
-
विद्राव्य खते ही मातीतून दिल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या तुलनेत पिकांना लवकर उपलब्ध होतात.
- रासायनिक खते जमिनीतून देण्यासाठी उशीर झाला असल्यास, ही खते फवारणीद्वारे देता येतात.
- पिकांचे उत्पादन आणि रासायनिक खताचा शास्त्रोक्त वापर यात सांगड घालणे सोपे जाते.
- विद्राव्य खते विभागून देता येतात.
- पिकांच्या मुळांच्या कार्यकक्षेतून निचरून किंवा वायु रूपात वाया जाण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे विद्राव्य खतांची कार्यक्षमता ही ७० ते ८० टक्के राहते.
- विद्राव्य खतांची कार्यक्षमता ही जमिनीचे गुणधर्म, पाण्याची गुणवत्ता, खताची क्षारता, खते देण्याचा कालावधी आणि खते देण्याची साधने यावर अवलंबून असते.

विद्राव्य खतांचा वापर केव्हा करावा
-
जास्त पाण्यामुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पिकांना अन्नद्रवे मिळत नसल्यास.
- पीक अन्नद्रव्याची कमतरता दर्शवित असल्यास.
- मातीतून दिल्या जाणाऱ्या खतांची कार्यक्षमता खूप कमी असल्यास.
- सिंचनाची आणि सिंचन संचाची उपलब्धता असल्यास.
- फवारणी करण्याकरीता असलेल्या सुविधा उपलब्ध असल्यास.

खत किती द्यावे?
- विद्राव्य खतांचा वापर करीत असतांना आणि त्यांची मात्रा काढत असताना, माती परीक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे.
- खत मात्रा ठरविण्यासाठी मातीची गुणधर्मेही माहित असणे आवश्यक आहे, अन्यथा खतांवरील खर्च वाढण्याची शक्यता असते.
- माती परीक्षण अहवालातील सहा स्तरीय वर्गीकरणानुसार अथवा विविध पिकांकरीता विकसीत केलेल्या गुणसुत्रांनुसार आणि सिंचनाच्या पाळ्या नुसार मात्रा ठरवावी.
- सहसा विद्राव्य खतांचा वापर करीत असतांना ३-४ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात विविध ग्रेड चा वापर केल्या जातो, काही वेळा ७-८ ग्रॅम प्रति लिटर खत वापर सांगितल्या गेला आहे. म्हणजेच १० लिटर च्या टाकी साठी ७०-१०० ग्रॅम खत वापरणे गरजेचे आहे.

Web Title: When and how to use water soluble fertilizers to reduce costs on fertilizers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.