Join us

पेरू लावायचं नियोजन करताय, कोणत्या जाती निवडाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 4:04 PM

पेरुच्या Peru Lagvad अनेक सुधारीत जाती उपलब्ध आहेत. यापैकी व्यापारीदृष्ट्या सरदार (लखनौ-४९), अलाहाबाद सफेद, ललित, जी-विलास या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

पेरु हे कमी पाण्यावर येणारे कणखर व फायदेशीर पिक आहे. महाराष्ट्रात कमी जास्त प्रमाणात वर्षभर पेरु फळे उपलब्ध असतात. फळांची रुचकर चव, भरपूर प्रमाणात असणारे 'क' जीवनसत्त्व तसेच खनिजद्रव्ये यामुळे पेरु लोकप्रिय आहे.

पेरुच्या अनेक सुधारीत जाती उपलब्ध आहेत. यापैकी व्यापारीदृष्ट्या सरदार (लखनौ -४९), अलाहाबाद सफेद, ललित, जी-विलास या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

सरदार (लखनौ ४९)- महाराष्ट्रातील बहुतांशी क्षेत्रावर या जातीची लागवड करण्यात आली आहे.डॉ. चिमा यांनी १९६९ साली प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे ही जात विकसीत केली आहे.याची झाडे ठेंगणी असून ती आडवी वाढतात.- फळे चवीला गोड आहेत.फळांचा गर पांढऱ्या रंगाचा आहे.बियांचे प्रमाण कमी आहे.

ललीतगुलाबी रंगाचा गर व फिक्कट पिवळ्या रंगाची फळे ही या जातीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.झाडे मध्यम उंचीची असतात.फळांचे सरासरी वजन १८५ ते २०० ग्रॅम आहे. आंबट गोड चवीमुळे खाण्यासाठी व प्रक्रिया उद्योगासाठी उपयोगी आहे.

वी. एन. आर. बिही- फळांचा आकार मोठा असून फळांचे वजन ८०० ते १००० ग्रॅम आहे.फळे लवकर पक्व होतात.फळांची टिकवण क्षमता चांगली आहे.

जी-विलास- मलिहाबाद, उत्तरप्रदेश या ठिकाणी निवड पध्दतीने ही जात विकसीत करण्यात आली आहे.झाडांचा विस्तार मोठा आहे. झाडे आडवी वाढतात.फळे गोलाकार आहेत.फळांचा रंग फिक्कट हिरवा ते पिवळसर आहे.फळांचे वजन ४०० ते ८०० ग्रॅम पर्यंत असते.फळांची टिकवण क्षमता चांगली आहे.

अधिक वाचा: Pineapple Cultivation: अननसाची लागवड कशी केली जाते?

टॅग्स :फलोत्पादनफळेशेतीपीकपीक व्यवस्थापन