Jamin Kharedi : आजकाल आपण पाहतोय की, सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Work Department) इरिगेशन तसेच पंचायत समिती, झेडपी या सर्वांच्या ज्या काही जागा आहेत. या जागेवर बांधकाम केल्यामुळे अतिक्रमणाचे प्रमाण वाढलं आणि आज-काल अतिक्रमण देखील काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्याचे परिणाम आज की कोट्यावधीचे नुकसान सामान्य जनतेचे होत आहे.
प्रॉपर्टीचा भोगवटदार वर्ग एक असला की संबंधित मालकाला हक्क असतो. परंतु भोगवटादार वर्ग दोन, महार वतन जमीन 6 ब, देवस्थान जमीन वर्ग 3 मिळकती बाबत जमिनी विक्री गहाण ठेवणे, तारण ठेवणे याबाबत हक्क नसतात. केवळ प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा (Satbara) पाहून कधी कधी हे लक्षात येत नाही. प्रत्यक्ष तलाठी कार्यालयातून मिळकतीबाबतचा भोगवटदार वर्ग कोणता आहे, याबाबत दाखला मिळतो.
हेही वाचा : Jamin Kharedi : खरेदी करावयाच्या मिळकतीबाबत केस सुरु असल्यास... जाणून घ्या सविस्तर
प्रॉपर्टीच्या उतारावरील शेरे आपण तपासले पाहिजेत. जसे भूसंपादन पुनर्वसन, कुळ जमीन, तुकडेबंदी, खाजगी वन, हस्तांतरणास बंदी, सक्षम प्राधिकरणाचे परवानगी व इतर विविध बाबी या सातबारा उतारा वर आपल्या निदर्शनास येतात ते आपण तपासले पाहिजे. तसेच प्रॉपर्टीमधून विद्युत तारा किंवा टेलिफोन तारा किंवा खांब आहे काय? त्यांच्या दिशा बदलणे शक्य आहे का? हाय व्होल्टेज तारा खाली बांधकाम करता येत नाही. त्यामुळे ते देखील तपासून घेतले पाहिजे.
हेही समजून घ्या....
प्रॉपर्ट संदर्भातील प्रकारातील देवस्थान वर्ग तीनमधील मिळकती वक्फसारख्या काही बोर्डाकडे, नोंदणीकृत मिळकती, गायरान, शासकीय पड, अशा मिळकतीवर कायदेशीर व्यवहार होत नाही. अनेक व्यवहार 99 वर्षांच्या करार केले जातात, हे सर्व बेकायदेशीर आहेत. प्रॉपर्टी कोणत्या धर्माची आहे, याबाबतीत देखील वकिलांचा सल्ला घेऊनच प्रॉपर्टी हक्क, अधिकार मालकी याबाबत त्या धर्माच्या कायद्यानुसार विचार करूनच खरेदी करावे.
आपण घेत असलेल्या प्रॉपर्टीजवळ कचरा डेपो, सार्वजनिक स्वच्छतागृह, नाला, कत्तलखाने अशा दुर्गंधी पसरवणारा बाबींच्या अंतर देखील तपासून सदर प्रॉपर्टी आपण खरेदी घेतली पाहिजे. जेणेकरून भविष्यात पश्चाताप होणार नाही. त्यामुळे सर्वच गोष्टींचे आपण तपासणी केली तर निश्चित आपले झालेले खरेदी ही योग्य पद्धतीने कायदेशीर असते.
प्रॉपर्टी हस्तांतरणाचे मार्ग
प्रॉपर्टीचे हस्तांतरण हे विविध मार्गाने होत असते. त्यामध्ये कुळ हक्क, बक्षीस पत्र, दत्तक पत्र, हक्क सोड, मृत्युपत्र, अदलाबदल, जप्त मालमत्ता, शेत जमिनीची खरेदी, वारस नोंद, जमिनीचे वाटप, खरेदीखत, गहाणखत, भागीदारी संस्थेची मालमत्ता, सहकारी संस्था, मुस्लिम देवस्थान, ख्रिश्चन देवस्थान, न्यास विषयक म्हणजेच ट्रस्ट, कंपनीचे मालमत्ता, दिवाळखोर मालमत्ता, अशा एक ना अनेक प्रकारे जमिनीचे हस्तांतरण होऊ शकते.
- अॅडव्होकेट मयूर कारभारी वाखुरे, जिल्हा व सत्र न्यायालय, नेवासा, अहिल्यानगर