Join us

वैयक्तिक विहीर व बागायती लागवड योजनेसाठी कुठे कराल अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 11:32 AM

रोजगार हमी योजना विभागातर्फे नवीन अॅप तयार करण्यात आले आहे. यामध्ये बागायती लागवड व सिंचन विहिरीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

कामाचा निपटारा झटपट व्हावा, त्यामध्ये पारदर्शकता असावी, यासह शेतकऱ्यांना कामासाठी हेलपाटे मारायला लागू नये, यासाठी रोजगार हमी योजना विभागातर्फे नवीन अॅप तयार करण्यात आले आहे. यामध्ये बागायती लागवड व सिंचन विहिरीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

"हॉर्टी' या अॅपमुळे ज्या शेतकऱ्यांना बागायतीची लागवड करायची आहे व सिंचनासाठी विहीर हवी आहे, अशा शेतकऱ्यांना 'हॉर्टी' या अॅपद्वारे अर्ज करता येतो. ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा असल्याने शेतकऱ्यांना कार्यालयात वारंवार खेपा मारण्याची आवश्यकता भासत नाही.

योजनेत समाविष्ट बाबी१) वैयक्तिक विहिर२) बागवानी लागवडफळबागफुलझाडऔषधी वनस्पतीमसाल्याची पिके

काय आहे जीएस हॉर्टी अॅप?- हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करता येतो.- अॅपवर शासन व शेतकरी लाभार्थ्यासाठी दोन स्वतंत्र विभाग आहेत.- बागायती व सिंचन विहिरीसाठी अनुदान हवे असेल तरी शेतकरी त्यासाठी अर्ज करू शकतात.

हॉर्टी अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा MAHA-EGS Horticulture/Well App

कागदपत्रेही करता येतात ऑनलाइन अपलोडहॉर्टी अॅपव्दारे शेतकरी लागवड/सिंचन विहिरीसाठी अर्ज करू शकतात.अर्जासोबत लागणारी अन्य कागदपत्रेही अॅपद्वारे डाऊनलोड करणे शक्य आहे.

विहीर, बागायती लागवडीसाठी करा अर्जशेतकरी विहीर किंवा बागायती लागवडीसाठी अर्ज करू शकतात. क्षेत्रानुसार शासनाकडून अनुदान देण्यात येते. अर्जासोबत शेतजमिनी, एकूण जागेचीही नोंदणी करणे शक्य आहे.

कागदपत्रे काय लागतात? शेतजमिनीचा सातबारा, आठ अ, जॉबकार्ड क्रमांक, शेतकऱ्यांची वर्गवारी, जमिनी मर्यादित असेल तर त्याबाबतची नोंद आदी कागदपत्रे जोडावी लागतात. अर्ज छाननीनंतर मंजुरी दिली जाते.

टॅग्स :फलोत्पादनशेतकरीफळेपाणीसरकारी योजनासरकार