यावर्षी पाऊस कमी पडला तरी खरीप हंगामात पेरलेले हळद पीक चांगले आले आहे; परंतु, त्यावर 'करपा' रोग पडला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातुर झाला असून शेवटच्या टप्यात तरी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मेळावे घेऊन मार्गदर्शन करावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हळदीवर कंदमाशीचा प्रादुर्भाव झालाय? या करा उपाययोजना..
यावर्षी एक नाही तर अनेक संकटे शेतकऱ्यांचा पिच्छा करू लागली आहेत; परंतु, सर्वच संकटांवर मात करून शेतकरी पुढे जात आहे. कोणत्याही संकटाला शेतकरी घाबरतही नाही. गतवर्षीपेक्षा यावर्षी हळदीचे पीक चांगले आले आहे; परंतु, 'करपा' रोगामुळे शेतकरीवर्ग चिंतित आहे. हळद हे नगदी पीक असून सद्य:स्थितीत हळदीला सरासरी ११ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. हळदीला 'करपा' व इतर रोगांनी शकतो; परंतु, विविध रोगांमुळे शेतकरी चिंतित आहे.
यावर्षी जवळाबाजारसह परिसरातील पुरजळ, सिरला, रांजाळा, वडद, नागापूर, असोला, कॉडशी, असोला, नालेगाव, पोटा (खुर्द), तपोवन, आडगाव (रंजे), बोरी (सावंत) आदी भागांत मोठ्या प्रमाणावर हळदीचे लागवड क्षेत्र आहे. परिसरात हळदीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत असले तरी भाव मात्र म्हणावा तसा मिळत नाही, याचेच तर वाईट वाटते. चांगला पाऊस झाल्यामुळे हळदीचे पीक जोमात आले होते. मात्र, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हळद पिकावर 'करपा' रोग पडला आणि तेव्हापासून हळदीला दृष्ट लागली.
कीटकनाशकाची किती फवारणी करावी?
माझ्याकडे वीस एकर जमीन असून त्यापैकी दोन एकर जमिनीवर हळदीची लागवड केली आहे. जून महिन्यापासून हळदीवर स्वर्च मोठ्या प्रमाणात केला आहे. त्यामुळे हळद चांगली आली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे हळदीवर करपा पडण्यास सुरुवात झाली. ती. त्यामुळे यावर्षी हळदीची वाढ खुंटली आहे. -मदन कन्हाळे, शेतकरी
यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. सोयाबीन व हळद पिके गेल्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हळदीवर करपा पडला आहे. दरवर्षीच हळद पिकावर 'करपा' रोग पडतो. यावर्षी अधिक पडला आहे.- अनिल दिलीपराव चव्हाण, शेतकरी
काय आहेत लक्षणे ?
पानांवरील ठिपके (करपा) पानांवर लंब गोलाकार तपकिरी रंगाचे अंडाकृती ठिपके पडतात. रोगट भाग वाळून तांबूस तपकिरी रंगाचा दिसतो.
नियंत्रण कसे मिळवाल?
लागवडीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे. ॲझोक्झिस्ट्रॉबीन + डायफेनकोनॅझोल १० मिली १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. याशिवाय जर बियाणांमध्येच काही बाबी लक्षात घेतल्या तर पिकावरील संभाव्य धोके टळू शकतात.
जैविक बीजप्रक्रिया
ही बीजप्रक्रिया प्रामुख्याने हळद लागवड करतेवेळी करावी. यामागे अॅझोस्पिरीलीयम १० ग्रॅम प्रति लिटर पाणी + स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी + व्हॅम (VAM) २५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेवून त्यामध्ये बियाणे १० ते १५ मिनिटे बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावे. ही बीजप्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत रासायनिक बीजप्रक्रियेच्या अगोदर करु नये. अगोदर रासायनिक बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीमध्ये २ ते ३ दिवस सुकवूनच जैविक बीजप्रक्रिया करावी.