Lokmat Agro >स्मार्ट शेती > पेन्शनचे टेन्शन कशाला? पोस्टात आली आहे ही नवी योजना... मिळवा वर्षाला उत्पन्न

पेन्शनचे टेन्शन कशाला? पोस्टात आली आहे ही नवी योजना... मिळवा वर्षाला उत्पन्न

Why pension tension? This new scheme has come in the post... Get income per year | पेन्शनचे टेन्शन कशाला? पोस्टात आली आहे ही नवी योजना... मिळवा वर्षाला उत्पन्न

पेन्शनचे टेन्शन कशाला? पोस्टात आली आहे ही नवी योजना... मिळवा वर्षाला उत्पन्न

ज्यांना शासकीय नोकरी नसते, अशांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांना भविष्याची चिंता असते. मात्र, पोस्ट कार्यालयाने पेन्शनसारखा लाभ देणारी मासिक बचत योजना (एमआयएस) सुरू केली आहे.

ज्यांना शासकीय नोकरी नसते, अशांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांना भविष्याची चिंता असते. मात्र, पोस्ट कार्यालयाने पेन्शनसारखा लाभ देणारी मासिक बचत योजना (एमआयएस) सुरू केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शोभना कांबळे
ज्यांना शासकीय नोकरी नसते, अशांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांना भविष्याची चिंता असते. मात्र, पोस्ट कार्यालयाने पेन्शनसारखा लाभ देणारी मासिक बचत योजना (एमआयएस) सुरू केली आहे.

पती-पत्नीने ही मासिक बचत योजना सुरू केल्यास निवृत्तीनंतरचा ताण कमी होऊ शकतो. या योजनेत ७.४ टक्के व्याज असून दरमहा पैसे गुंतविल्यास येणारे व्याज बचत खात्यात जमा होते. शेतकरी पती-पत्नी या योजनेत भाग घेऊ शकतात.

ही रक्कम बचत (सेव्हिंग) खात्यातच जमा असल्यास त्यावर पुन्हा चार टक्के व्याज दिले जाते. विशेष म्हणजे किमान एक हजार रुपये या योजनेत गुंतवता येतात. त्यामुळे ही योजना पेन्शन देणार असल्याने पोस्टाच्या या योजनेला लोकप्रियता मिळत आहे.

काय आहे पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना?
मासिक बचत योजनेमध्ये एकरकमी एकाच वेळी रक्कम गुंतवल्यास दरमहा व्याज मिळते. या योजनेचा लाभ सर्व स्तरातील नागरिकांना घेता येतो. या योजनेत फिक्स डिपॉझिटसारखा व्याजदर मिळतो.

दोन प्रकारचे खाते
१) वैयक्तिक : वैयक्तिक खात्यात जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. किमान एक हजार रुपये गुंतवणूक करूनही खाते सुरू होते.
२) संयुक्त : संयुक्त खात्यात दोन अथवा तिघांना पैसे गुंतवता येतात. यामध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

किती वर्षांसाठी गुंतवणूक?
या योजनेमध्ये कमाल पाच वर्षे पैसे गुंतविणे बंधनकारक आहे. एक वर्षापर्यंत या योजनेतून माघार घेता येत नाही. मुदतपूर्व पैसे परत मिळवायचे असतील तर किमान दोन टक्के रक्कम कपात केली जाते.

किती गुंतवणूक केली तर किती मिळतात?
- या योजनेमध्ये पाच लाख रुपये गुंतविल्यास वर्षाला ३६,९९६ रुपये मिळतात. पेन्शनप्रमाणे प्रत्येक महिन्याला ३,०८३ रुपये मिळतात.
- व्यक्त्तीने ९ लाख रुपये गुंतविले तर वर्षाला ६६,६०० रुपये मिळतात. म्हणजेच प्रत्येक महिन्याला पेन्शनप्रमाणे ५,५५० रुपये मिळतात.
- १५ लाख रुपये गुंतविले तर प्रत्येक वर्षाला १,११,०० म्हणजेच पेन्शनप्रमाणे प्रत्येक महिन्याला ९,२५० रुपये देणारी ही योजना आहे.

Web Title: Why pension tension? This new scheme has come in the post... Get income per year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.