प्रत्येक भाग येतो वापरात; म्हणूनच आहे नारळाला महत्त्व. नारळ हे असे एकमेव फळ आहे की, ज्याच्या प्रत्येक भागाचा वापर होतो. शिवाय धार्मिक, आरोग्य, सांस्कृतिक, खाद्यपरंपरा, तसेच व्यवसायिकदृष्ट्या नारळाला प्रचंड महत्त्व आहे.
नारळ पिकाबाबत जनजागृती करण्यासाठी एशियन अँड पॅसिफिक कोकोनट कम्युनिटीकडून (एपीसीसी) २००९ पासून २ सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो.
नारळाचे अर्थकारण आणि महत्त्वाविषयीदेशातील नारळाचे उत्पादन (उत्पादन हजार टनमध्ये) १९९१-९२ १०,०८०२००४-०५ ८,८२९२००९-१० १५,७३०२०१४-१५ १४,०६७२०१९-२० १४,००६ २०२१-२२ १३,२८३स्त्रोत: केंद्रीय कृषी मंत्रालय
पूजेसह आरोग्यासाठीही महत्त्वाचे- प्रत्येक धार्मिक पूजाविधींमध्ये नारळाचा वापर केला जातो.- नारळपाणी हे इलेक्ट्रोलाइटचा उत्तम स्रोत त्यामुळे शरीरात पाणी संतुलित प्रमाणात राहते.- ओल्या नारळामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक मूल्ये असतात.- नारळाच्या दुधाचा विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापर होतो, तसेच नारळ तेलाचाही दररोज वापर केला जातो.- नारळाच्या काथ्यांपासून दोरी, पायपुसणी, चटई आदी विविध वस्तू तयार केल्या जातात.
प्रमुख उत्पादक राज्येकर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, प. बंगाल, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, बिहार इ.
काही रंजक माहिती- नारळाच्या झाडाची सरासरी उंची ९८ फूट असते.- ६०-८० फुटांच्या झाडांना बुटके समजले जाते.- जगातील सर्वांत उंच नारळाचे झाड १८६ फूट उंच होते.- जगात इंडोनेशिया, फिलिपिन्स, भारतात नारळाचे सर्वाधिक उत्पादन होते.- एका झाडापासून दरवर्षी सरासरी १८० नारळ मिळतात.- दरवर्षी जगात नारळ डोक्यावर पडून १५० लोकांचा मृत्यू होतो.