Join us

World Environment Day; एक तरी झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 9:42 AM

पृथ्वी ही आपली आई आहे आणि निसर्ग आपले जीवन आहे. निसर्गाशिवाय मानवी जीवन शक्य नाही, परंतु तरीही आपण विकासाच्या आणि आधुनिकतेच्या शर्यतीत पर्यावरणाची हानी करत आहोत. आपण निसर्गापासून दूर जात आहोत.

पृथ्वी ही आपली आई आहे आणि निसर्ग आपले जीवन आहे. निसर्गाशिवाय मानवी जीवन शक्य नाही, परंतु तरीही आपण विकासाच्या आणि आधुनिकतेच्या शर्यतीत पर्यावरणाची हानी करत आहोत. आपण निसर्गापासून दूर जात आहोत. आपल्याला वेळोवेळी पर्यावरणाची हानी होण्याचाही फटका बसत आहे. कधी पूर येतो तर कधी ढग फुटतात. कुठेतरी पृथ्वीवर पाण्याचा दुष्काळ पडत आहे तर कुठे जमीन आग ओकत आहे हे सर्व केवळ हवामान बदलामुळे घडत आहे.

जागतिक पर्यावरण दिन का साजरा करतात?झाडे तोडल्यामुळे हवा इतकी प्रदूषित झाली आहे की शहरामध्ये श्वास घेणे कठीण झाले आहे. शहरांचे जीवन , पर्यावरणआणि निसर्गापासून कोसो दूर झाले आहे. येथे राहणाऱ्या लोकांना असे आजार होत आहेत जे याआधी लोकांनी कधी ऐकले नाहीत किंवा पाहिलेही नाहीत. या सगळ्याचे कारण कुठेतरी आपली ढासळलेली जीवनशैली आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जगभरात पर्यावरण वाचविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविले जाते म्हणूनच दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. विश्वाचे वाढते तापमान, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, पर्यावरण प्रदूषण, नागरिकांचे वाढत असलेल्या आजार, कोरोना सारख्या महामारीचा हैदोस, निसर्गात अनपेक्षितपने घडणाऱ्या घटना व प्रसंग या मागे महत्त्वाचे कारण म्हणजे मानवा करवी होणारी प्रचंड वृक्षतोड होय.

दरवर्षी जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय पातळीवर वैयक्तिक तथा संस्था, मंडळे खूप मोठ्या प्रमाणात वृक्षाची रोपटी लावतात ते वाढविण्यासाठी संकल्प केला जातो. मात्र रोपटी लावल्यानंतर त्याकडे कोणी पाहत नाही. डोंगरावर, रस्त्याच्या कडेला, सरकारी जंगलात, मोकळ्या जागेत कोटी ने वृक्ष दरवर्षी लावतात मात्र त्याकडील दुर्लक्षामुळे ती काही दिवसातच नष्ट होतात.

रोपटी लावणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मात्र ही लागवड केवळ लागवडी पुरते मर्यादित राहू नये, तर लावलेली रोपटी ही जिवंत कशी राहतील , त्यांचे संरक्षण, संवर्धन व संगोपन कसे करता येईल यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम दोन तीन वर्षाचा आखायला हवा तरच ती रोपटी वाढतील व वृक्ष लावल्याचा उपयोग होईल.

दरवर्षी वृक्षारोपण का?दरवर्षीच कोटीने रोपटी लावतात मात्र त्यातून बोटावर मोजणे इतकी च जगतात, मग या कोटीने लावलेल्या वृक्षांचे विषयी काय? वृक्ष लावण्या मागचा हेतू स्पष्ट आहे, पर्यावरण समतोल राखल्या जावा, वाढते प्रदूषण थांबावे, मानवी जीवन आरोग्यदायी व निरोगी राहावे, अधिकचा पाऊस यावा, निसर्गातील प्रत्येक वस्तू सुरक्षित रहावी , जमिनीची धूप थांबावी व पर्यावरण संवर्धन व्हावे हे सर्व जनहितासाठी आहे. तर मग वृक्षारोपण केवळ देखावा का बरे असावे, त्यासाठी सर्व स्तरावर सर्व कश प्रयत्न का बरे होऊ नये?

रोपटी लावल्यावर त्याची जबाबदारी निश्चित करारोपटी लावणे, फोटो काढून ते वर्तमानपत्रात छापून यावे एवढ्या पुरती हे वृक्षारोपण मर्यादित असू नये तर शासनाने ही रोपटी जगविण्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच सामाजिक संस्था, काही सामाजिक कार्यकर्ते,स्थानिक स्वराज्य संस्था, यांच्यावर त्या रोपट्याच्या देखभालीची, काटेरी कुंपण लावून पाणी टाकने, इत्यादी जबाबदारी सोपवावी. वृक्षारोपणात शेतकरी वर्ग यांचेही सहकार्य घेण्यात यावे यासाठी शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात मोफत वृक्ष रोपटी त्यांच्या शेताच्या बांधावर लावण्यासाठी ते आपला शेतपरिसर या रोपट्यांनी व्यापून टाकतील व त्यांचे संरक्षण , संवर्धन व संगोपन मोठ्या प्रमाणावर होईल व रोपटी जगतील.

रोपटी जगविने महत्त्वाचेरोपटी लावून ती काळजीपूर्वक जगविणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जे कोणी झाडांची रोपटी लावतात त्यांनी ती जगविण्याचा संकल्प केला पाहिजे. शाळा महाविद्यालयात विद्यार्थी सहभाग महत्त्वाचा होय, शाळा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना या विद्यार्थ्यांच्या सहभागातून रोपटे लावणे जगविने शक्य आहे.

शाळा महाविद्यालय तसेच विद्यापीठ यांचा परिसर ही रोपटी लावून ती जगविने शक्य आहे. रोपटी जगविण्यासाठी ज्यांनी लावली त्यांचे नाव त्या रोपट्यांना देणे, प्रशस्तीपत्र देणे उपक्रम राबवावा जे कुणी रोपटी लावतील व दोन-चार वर्ष जगवितील त्यांना शासनाने प्रसिद्ध पत्र देण्याची योजना राबवावी, तसेच ज्या एन जी ओ आहेत त्यांना दरवर्षी ठराविक प्रमाणात रोपटे जगविण्याचे लक्ष दिल्यास व त्या मोबदल्यात त्यांना काही सवलती दिल्यास रोपटी मोठ्या प्रमाणात जगविणे शक्य आहे.

कृषी खाते, वनसंवर्धन विभाग, वृक्ष विभाग पाणीपुरवठा विभाग यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी रोपटी लावण्याचे ठराविक उद्दिष्ट देऊन चार-पाच वर्षे जगविली तर त्यांना प्रोत्साहन पर काही बक्षीस देता येईल. सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक यांना यात सामावून घेऊन लावलेली रोपटी जगविण्यात त्यांचाही सहभाग घेता येईल, या राष्ट्रीय व समाज हिताच्या कार्यात वृक्ष लावणे व जगविने यात जास्तीत जास्त नागरिकांना सामावून घेऊन लावलेली रोपटी जगविने शक्य होऊ शकते. 

लग्न समारंभ, वाढदिवस, घरभरणी कार्यक्रमात उपस्थितांना रोपटी वाटप करावृक्षाचे मानवी जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन ही वृक्षरोपटी जगविल्यास त्याचे सजीवांना मिळणारे लाभ याचे प्रबोधन लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमात करून इतरांना एक एक वृक्ष रोपटी भेट देऊन ही जगविण्यासाठी सर्व कस प्रयत्न केल्यास बरीच रोपटे जगविण्यास सहाय्य होऊ शकते. चला तर येथून पुढे रोपटी लावून ती जगविण्याचा यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचाच संकल्प सोडू या...

प्रा. संजय बाबासाहेब बडे सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर7888297859

टॅग्स :पर्यावरणनिसर्गपाणीप्रदूषणलागवड, मशागतइनडोअर प्लाण्ट्स