लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिस लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे.
लक्षणे- लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते.- हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरां फक्त हिरव्या दिसतात.- सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे.- लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.
कारणे- लोह ची कमतरता विशेषतः कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते.- वनस्पतींमध्ये हिरव्या रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते.- बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते.- तथापि, बऱ्याचदा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते.
उपाययोजना- शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी.- ०.५ टक्के (५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) फेरस सल्फेट ची पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (II) ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
अधिक वाचा: Soybean Pest Management: खोडमाशी व चक्रभुंगा यांपासून सोयाबीनला वाचविण्याचे सोपे उपाय