- रविंद्र शिऊरकर
वनराईने फुललेले गाव, माळरान यात अलीकडे सिमेंट काँक्रीटचा प्रसार वाढल्याने हिरवळ कमी झाली परिणामी आपल्याला वातावरणीय बदलांना सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलून गेले आहे. अति पाऊस तर अति दुष्काळ अशी विविध कारणे यामुळे आपल्याला बघावयास मिळत आहे. जमिनीची उष्णतेमुळे होणारी ही झीज भरून काढण्यासाठी या सर्वांवर उपाय काय असा प्रश्न यातून निर्माण होतो त्याचे उत्तर म्हणजे वृक्ष लागवड. आपल्याकडील विविध वृक्षांचे फायदे आपण जाणून त्यांची लागवड केली तर अधिक फायदा मिळू शकतो.
त्यासाठीच आपण या लेखांतून विविध वृक्षे व त्यांचे फायदे जाणून घेणार आहोत ज्यामुळे कोणत्या वृक्षांची लागवड कधी कुठे करावी हि आपल्याला समजेल.
औषधी झाडे : हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडुनिंब, करंज, रिठा, निरगुडी
हवामान स्वच्छ ठेवणारी झाडे : धुजा, पळस, सावर, कदंब, आमलतास,
१२ तासापेक्षा अधिककाळ प्राणवायु देणारी झाडे : वड, पिंपळ, उंबर, नांद्रुक, कडुनिंब, कदंब
वनशेतीसाठी उपयुक्त : आवळा, अंजीर, फणस, चिंच, तुती, करवंद, बोर, करंज
हवेतील प्रदुषण दर्शविणारी झाडे : पळस व चारोळी
घराभोवती लावण्यास योग्य झाडे : रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल
रस्त्याच्या मधील भागात लावण्यास योग्य झाडे : कोरफड, शेर, कोकली, रूई, जट्रोफा, अश्वगंधा, सिताफळ
शेताच्या बांधावर लावण्यास योग्य झाडे : बांबु, हादगा, शेवगा, शेवरी, तुती, भेंडी, तुळस, कडुलिंब, कडीपत्ता,
शेताच्या कुंपनासाठी : सागरगोटा, चिल्हार, शिककाई, हिंगणी, घायपात, जट्रोफा
शेतजमीनीची सुपीकता वाढविणारी झाडे : उंबर, करंज, साधी बाभुळ, शेवरी
सरपणासाठी उपयुक्त झाडे : देवबाभुळ, खैर, बाभुळ, हिवर, धावड, बांबु
औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषण निवारण करण्यासाठी : पिंपळ, करंज, पुत्रजीवी, उंबर, अशोक, शिरीष, आंबा, सिताफळ, जांभुळ, रामफळ, अमलतास, पेरू, बोर, कडुनिंब, आवळा, चिंच, कदंब, मोहा, बेल,
धुळीचे कण व विषारी वायुपासून निवारण करण्यासाठी (सर्व जीवनदायी वृक्ष) : आंबा, अशोक, बकुळ, सोनचाफा, जास्वंद, पारिजातक, रातराणी, मेहंदी, तुळस, मोगरा