Join us

बागायतीसह कोरडवाहू शेतीला फायद्याचा शेतकऱ्याने निर्माण केला निर्यातक्षम शेवगा वाण; मराळे पॅटर्नची विदेशात चर्चा

By रविंद्र जाधव | Published: September 04, 2024 9:53 AM

आपल्या संशोधित रोहित - १ शेवगा (shevga rohit -1) वाणाची लागवड ते निर्यात असा शेवगा शेतीचा यशस्वी 'मराळे पॅटर्न' निर्माण करत. एकरी ५ लाख रुपये उत्पादकता विकसित करून शेतकऱ्यांना आधुनिक समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारे शेवगा संशोधक व प्रगतीशील शेतकरी म्हणजे बाळासाहेब मराळे. (drumsticks farming)

आपल्या संशोधित रोहित - १ शेवगा वाणाची लागवड ते निर्यात असा शेवगा शेतीचा यशस्वी 'मराळे पॅटर्न' निर्माण करत. एकरी ५ लाख रुपये उत्पादकता विकसित करून शेतकऱ्यांना आधुनिक समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारे शेवगा संशोधक व प्रगतीशील शेतकरी म्हणजे बाळासाहेब मराळे.

नाशिक जिल्ह्यातील कोरडवाहू सिन्नर तालुक्याच्या शहा येथील बाळासाहेब हे शिक्षण पूर्ण करताच नोकरी निमित्ताने पुणे येथे गेले. सन १९९६ च्या दरम्यान एकदा पुणे येथील बाजारात फेरफटका मारतांना आपल्याकडे अल्प प्रमाणात दिसणारा शेवगा इथे मात्र मोठ्या प्रमाणात दिसत असल्याचे लक्षात आले.

कमी लांबी असलेली रोहित - १ जातीची शेवगा शेंग खाण्यास चविष्ट आहे. सोबत निर्यातक्षम रोहित -१ वाण आहे.

पुढे उत्सुकतेपोटी बाळासाहेब यांनी शेवगा शेतीची माहिती जमा करायला सुरुवात केली. राहुरी, दापोली सह बाहेरील राज्यातील काही विद्यापीठ असे अनेक दौरे करत त्यांनी नोकरी दरम्यान शेवगा शेतीची माहिती मिळविली. ज्यातून जमा झालेल्या विविध बीजांची पुढे आपल्या शेतात लागवड केली. 

अवघी १० - १५ फूट विहीर असलेल्या कोरडवाहू शेती उत्पन्नाच्या तुलनेत योग्य रित्या जोपासलेला शेवगा समतोल उत्पन्न देत असल्याचे लक्षात येताच बाळासाहेब पूर्णवेळ शेतीत आले. पुढे योग्य बाजार, निर्यात, प्रक्रिया उद्योग आदींचा हा प्रवास सुरू असतांनाच चविष्ट चवीचा सोबत गावरान सदृश्य लांबी असलेल्या रोहित - १ या शेवगा वाणाची निर्मिती झाली. आज या माध्यमातून  शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन देखील बाळासाहेब करत आहे. 

रोहीत - १ शेवगा 

वार्षिक दोन बहरांसह भरघोस उत्पादन देणारा तसेच सिंगापूर, कॅनडा, दुबई, लंडन आदी बाजारपेठेत निर्यातक्षम ठरलेल्या रोहित - १ वाण बागायती सह कोरडवाहू शेतकऱ्यांना देखील आर्थिक फायद्या मिळवून देणारा असल्याचे बाळासाहेब सांगतात. तामिळनाडू कृषी विद्यापीठाने मान्यता दिलेल्या या रोहित - १ शेवगा वाणांस व बाळासाहेब यांच्या या शेवगा संशोधनास राज्य सरकार सह विविध पुरस्काराने वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे हेही विशेष. 

शेवगा लागवड ते निर्यात असा परिपूर्ण 'मराळे पॅटर्न'

शेतकरी बांधवांस शेवगा लागवड करिता आपल्या ४ लाख रोप क्षमतेच्या रोपवाटीकेतून रोपे देत सोबत लागवड तंत्र, खत व्यवस्थापन, छाटणी, किड व्यवस्थापन, तर यासोबतच विक्री मध्ये थेट परदेशी निर्यात पर्यंत मार्गदर्शन बाळासाहेब आपल्या मराळे पॅटर्न अंतर्गत करतात. ज्यात ते शेतकऱ्यांना वेळोवेळी थेट बांधावर जात देखील मोफत मार्गदर्शन करतात. 

हेही वाचा - Sericulture Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत महेशने शोधली रेशीम शेतीतून नोकरी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसिन्नरनाशिकभाज्या