हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील दिवंगत शेतकरी प्रकाशराव वानखेडे यांची कन्या पूजा रविकांत कलाने यांची युरोप बेल्जियम या देशात कॉग्निझट कंपनीत वरिष्ठ इंजिनिअर म्हणून नियुक्ती झाली आहे. ७० लाखांचे पॅकेज मिळवून त्यांनी युरोपात भरारी घेतली आहे.
उपसरपंच अॅड. अतुल प्रकाश वानखेडे यांची बहीण व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शीलाबाई वानखेडे यांची कन्या पूजा वानखेडे (कलाने) यांचे शिक्षण आयटी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पुणे येथे झाले. तालुक्यातील पहिली महिलाशेतकरी कन्या प्रगत राष्ट्रात उच्च पदावर विराजमान झाल्याबद्दल सासरकडील पंडितराव कलाने यांनी प्रोत्साहन दिले. प्रकाशराव खंदारे, विलासराव सूर्यवंशी, भानुदास कोलमकर, नंदकुमार दमकोंडवार, सुनील वानखेडे, नामदेव मोकासवाड, दीपक कल्याणकर, अरविंद धोबे, दशरथराव वानखेडे, आपराव वानखेडे, सुरेश वानखेडे, के. एम. कवडे आदींनी त्यांचा सत्कार केला.
बेल्जियम येथे उच्च पदावर झाली नियुक्तीपुजा कलाणे यांना कॉग्निझट कंपनी पुणे येथे चांगले पॅकेज देऊन नोकरी मिळाली. त्यांचे उत्कृष्ट काम पाहून कॉग्निझट कंपनीने थेट प्रगत राष्ट्र युरोप खंडातील बेल्जियम येथे उच्च पदावर नियुक्ती देऊन ७० लाखांचे पॅकेज दिले. २ सप्टेंबर रोजी त्या विमानाने रवाना होत असून, एका शेतकयाच्या मुलीने थेट युरोपात भरारी घेतल्याने सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.