Lokmat Agro >लै भारी > ऊस शेतीला उद्योगाची जोड; सेंद्रिय गुळ निर्मितीतून मिळतोय हेक्टरी चार लाखांचा नफा

ऊस शेतीला उद्योगाची जोड; सेंद्रिय गुळ निर्मितीतून मिळतोय हेक्टरी चार लाखांचा नफा

Addition of Industry to Sugarcane Farming; A profit of four lakh per hectare is being obtained from organic jaggery production | ऊस शेतीला उद्योगाची जोड; सेंद्रिय गुळ निर्मितीतून मिळतोय हेक्टरी चार लाखांचा नफा

ऊस शेतीला उद्योगाची जोड; सेंद्रिय गुळ निर्मितीतून मिळतोय हेक्टरी चार लाखांचा नफा

शेतकऱ्याने सेंद्रिय गूळ निर्मिती करून साधली आर्थिक प्रगती

शेतकऱ्याने सेंद्रिय गूळ निर्मिती करून साधली आर्थिक प्रगती

शेअर :

Join us
Join usNext

दरवर्षी ऊस उत्पादकाला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. उसाची वेळेवर तोडणी होत नाही, तर कधी वेळेवर पैसे मिळत नाहीत. मात्र, यातून मार्ग काढत कंधार तालुक्यातील बारूळ येथील शेतकऱ्याने सेंद्रिय गूळ निर्मितीतून चांगले उत्पन्न घेतले आहे.

युवक शेतकरी गजानन गालशेटवाड यांना वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी एक हेक्टरवर सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड करून स्वतःच गूळ निर्मिती सुरू केली. त्यात त्यांना हेक्टरी चार लाख रूपयांचा नफा झाला. त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने १२ एकरवर सेंद्रिय उसाची लागवड केली. सध्या उसाचे गुन्हाळ रु. हेक्टरी ७० क्विंटलचा उतारा मिळत आहे. सेंद्रिय गुळाला जिल्ह्यासह परजिल्ह्यातही विविध ठिकाणी चांगलीच मागणी असल्याचे दिसून येत आहे. 

बाजारपेठेत गुळाला ६० ते ६५ रुपये भाव

सेंद्रिय गुळाला चांगला प्रति किलो ६० ते ६५ रुपये भाव मिळत असून, गेल्या वर्षांपासून नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यातील बाजारात मागणी आहे. शेतीपूरक उद्योगातून ५० ते ६० मजुरांना रोजगार मिळत आहे.

संबंधित वृत्त: कहाणी उसाच्या गुऱ्हाळांची; साखरेच्या पट्ट्याला सेंद्रिय गुळाची गोडी

ग्रामीण भागातील रोजगारांना हाताला मिळाले काम

आठ वर्षांपासून नैसर्गिक शेती करीत असून, सुरुवातीस एक हेक्टरवर उसाची लागवड केली. त्यामध्ये आंतरपीक घेतले. उसाचे उत्पन्न कमी मिळाले. परंतु, आंतर पिकापासून चांगले उत्पन्न मिळावे. त्यानंतर सेंद्रिय गूळ निर्मिती सुरू केली. सध्या १२ पेपरवर सेंद्रिय उसाची लागवड केली. या गुळास व पाकाला चांगली मागणी आहे. ग्रामीण भागातील रोजगारांना हाताला कामे मिळत आहे. - गजानन गालशेटवाड, शेतकरी बारुळ.

Web Title: Addition of Industry to Sugarcane Farming; A profit of four lakh per hectare is being obtained from organic jaggery production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.