Lokmat Agro >लै भारी > ऊस शेतीला दिली आधुनिकतेची जोड; एकरी १०८ टन झाली विक्रमी ऊस तोड

ऊस शेतीला दिली आधुनिकतेची जोड; एकरी १०८ टन झाली विक्रमी ऊस तोड

Advanced sugarcane farming; a record sugarcane production 108 tons per acre | ऊस शेतीला दिली आधुनिकतेची जोड; एकरी १०८ टन झाली विक्रमी ऊस तोड

ऊस शेतीला दिली आधुनिकतेची जोड; एकरी १०८ टन झाली विक्रमी ऊस तोड

शेतीला आधुनिकतेची जोड देत जिद्द, चिकाटी, प्रामाणिक कष्टाच्या जोरावर योग्य व्यवस्थापन करत टेळेवाडी (ता. दौंड) येथील दशरथ तानाजी टेले यांनी एक एकर माळरान ऊसाच्या शेतीमध्ये एकशे आठ मेट्रीक टन उत्पादन घेतले.

शेतीला आधुनिकतेची जोड देत जिद्द, चिकाटी, प्रामाणिक कष्टाच्या जोरावर योग्य व्यवस्थापन करत टेळेवाडी (ता. दौंड) येथील दशरथ तानाजी टेले यांनी एक एकर माळरान ऊसाच्या शेतीमध्ये एकशे आठ मेट्रीक टन उत्पादन घेतले.

शेअर :

Join us
Join usNext

संदीप नवले
शेतीला आधुनिकतेची जोड देत जिद्द, चिकाटी, प्रामाणिक कष्टाच्या जोरावर योग्य व्यवस्थापन करत टेळेवाडी (ता. दौंड) येथील दशरथ तानाजी टेळे यांनी एक एकर माळरान ऊसाच्याशेतीमध्ये एकशे आठ मेट्रीक टन उत्पादन घेऊन निश्चितच इतर शेतकऱ्यांच्या समोर आदर्श ठेवला आहे.

दशरथ टेळे यांनी सुरवातीला कांदा पिक निघाल्यानंतर शेतीची मशागत करताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोन वेळा उभी आडवी नांगरट तसेच काकरणी, रोटावेटर करण्यात आली. त्यानंतर कंपोस्ट शेणखत मिश्रण काकरणी करून साडेचार फूट रुंदीचा पट्टा काढण्यात आला.

जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवडयुक्त शेती तयार झाल्यानंतर घरगुती नव्याने विकसीत करण्यात आलेले कोईमतूर ८६०३२ ऊसबेणे वाणाची लागवड केली. शेतीची चांगली मशागत केल्याने शंभर टक्के उगवण झाली.

रासायनिक खतांचा केवळ दहा टक्के वापर केला. पहिली खांचा मात्रा ते अगदी शेवट पर्यंत पालापाचोळा, शेणखतापासून बनवलेले मिश्रण खत, सेंद्रिय खतांचा वापर केला. वेळोवेळी करण्यात आलेल्या ड्रिचिगच्या सहाय्याने औषध व खतांची मात्रा देणे देखील सहज शक्य झाले.

ऊसाच्या बांधणीला रासायनिक खतांच्या एकत्र मात्रेच्या स्वरुपात देण्यात आले. त्यानंतरच्या कालावधीत मिकनेल्फ, पीएचबी, पोटॉशियम सोनायीट खतांच्या तसेच बेसनपीठ, गुळ, गोमूत्र यांची देखील एकत्रितपणे फवारणी घेण्यात आली.

पारंपरिक पाटाने पाणी देण्याची पद्धतीचा वापर केला असला तरी पट्टा पद्धतीने पर्यायाने तणांवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले. परीणामी कुठलेही रासायनिक औषधे न फवारता घरगुती खुरपणीवर भर देऊन तणव्यवस्थापन करण्यात आले. विशेष म्हणजे पट्टा पद्धतीने लागवड केल्याने भरपूर सुर्यप्रकाश व मोकळी हवा मिळाल्याने ऊसाची वाढ चांगली झाली.

सतरा महिने कालावधीत पंचेचाळीस ते पन्नास कांड्याची संख्या वाढ झालेला ऊसाचे एकरी एकशे आठ मेट्रीक टन उत्पादन मिळाले असून उसतोड झालेला ऊस पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यास देण्यात आला असून उत्पादन चांगले मिळाल्याने कष्टाचे चीज होत असल्याचे दशरथ टेळे यांनी सांगितले.

शाश्वत उत्पादनासाठी शेणखत महत्त्वाचे
शेती करायची म्हटली तर घरात भरपूर पशुधन हवे अशी आजोबांची शिकवण होती. शेणखतामुळे जमिनीचा पोत टिकतो, सुधारतो आणि शेती फायद्यात राहते असे ते कायम सांगायचे, त्यानुसार शेणखताचा वापर शेतीमध्येच केला जात असल्याने मातीचा पोत टिकून आहे.

अधिक वाचा: काय सांगताय.. ऊसात वांग्याचे आंतरपिक; १८ गुंठ्यात तब्बल सव्वा लाखाचे उत्पन्न

Web Title: Advanced sugarcane farming; a record sugarcane production 108 tons per acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.