नितिन कांबळे
पेशाने शिक्षक असताना फक्त शाळा न करता आधुनिक शेतीकडे वळून पत्नीच्या मदतीने ५० गुंठे शेतात जांभूळ शेती फुलवली. खर्च हजारांत झाला असून, उत्पन्न आता लाखात मिळत आहे. कमी श्रमात शेती करून तरुणाईपुढे आदर्श निर्माण केलेल्या शेतकऱ्याची ही यशोगाथा.
बीड जिल्ह्यातील आष्टी हा दुष्काळी तालुका आहे. दरवर्षी पावसाचे कमी प्रमाण असल्याने अल्प पाण्यावर शेती करावी लागते. केळसांगवी येथील अशोक पडोळे पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आधुनिक शेती कशी करता येईल, यासाठी मित्रांसोबत चर्चा करून जांभूळ शेतीचा निर्णय घेतला.
मधुमेहावर उपाय
■ जांभूळ हे आयुर्वेदिक असून, मधुमेह आजारावर रामबाण उपाय आहे. शहराच्या ठिकाणी चांगली बाजारपेठ मिळते.
■ आठ वर्षांची बाग झाल्यानंतर एकरी दहा टन उत्पन्न निघून १५ लाखांची उलाढाल होईल. तरुणांनी शेती चांगली असेल तर त्यात करिअर करावे आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी, असे शेतकरी अशोक पडोळे यांनी सांगितले.
५० गुठ्यांत जांभूळ बागेतून आर्थिक उलाढाल
■ तीन वर्षांपूर्वी छत्तीसगड येथून ३८० झाडे आणून १२ बाय १० वर लागवड केली. शेत तलावाच्या माध्यमातून ड्रीपच्या मदतीने पाण्याची सोय केली. एक टन पहिले फळ आले.
■ त्याला अहमदनगर येथील बाजारपेठेत १८० रुपये किलो भाव मिळाला. त्याचे १ लाख ८० हजार रुपये उत्पन्न मिळाले.
■ जांभूळ शेती ही आयुर्वेदिक असून, कमी मेहनतीची शेती. आहे. शाळा संभाळत पत्नी रूपाली यांच्या मदतीने ५० गुक्यांत जांभूळ बागेतून आर्थिक उलाढाल झाली आहे.
हेही वाचा - Success Story आंब्याने दिली सुखाची दिशा; प्रगतीशील मिठ्ठू काकांची ही यशकथा