Join us

द्राक्षासोबत बांधावरचे आंबेही पोहोचविले विदेशात अन् पटकावला शासनाचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 4:43 PM

आधुनिक तंत्रज्ञानासोबतच शेतीला संयुक्त कुटुंबाचीही चांगली जोड मिळाली. शेतीचे वार्षिक उत्पादन हे जवळपास ६० ते ७० लाखांपर्यंत आहे.

तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी शिवारात द्राक्षांसोबतच बागेच्या भोवतालच्या बांधावर लागवड केलेल्या आंब्याचीही  विदेशात निर्यात करून वर्षाकाठी सहा ते सात लाखांचे उत्पन्न घेत सुदर्शन शिवाजी जाधव यांनी आर्थिक उन्नती साधली आहे. याचीच दखल कृषी विभागाने घेत त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला आहे.

जाधव यांच्या  सामूहिक कुटुंबामध्ये जवळपास ३८ एकर जमीन आहे. पारंपरिक पिकांची कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत की विसार या योजनेमधून एक हेक्टर द्राक्ष बागेची लागवड केली आहे. यानंतर हळूहळू त्यांनी एमएसएन सुपर, सोनाका निर्यातक्षम वाणाचे उपाधन घेतले. पाण्याची गरज भागविण्यासाठी त्यांनी २०१३ मध्ये गावातील अन्य शेतकन्यांना एकत्र करून आत्मा संतकरी मठाची स्थापना केली.

संयुक्त कुटुंबाचीही चांगली जोड

आधुनिक तंत्रज्ञानासोबतच माझ्या शेतीला संयुक्त कुटुंबाचीही चांगली जोड मिळाली. शेतीचे वार्षिक उत्पादन हे जवळपास ६० ते ७० लाखांपर्यंत आहे. त्यामध्ये द्राक्षाचे उत्पादन मुख्य असून ते ४० ते ४५ लाखांपर्यंत होते. बांधावर जवळपास साडेतीनशे आंब्याची झाडे असून, यातूनही दरवर्षी पाच ते सहा लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. -सुदर्शन जाधव, जारी

गटाच्या माध्यमातून अनेक ठिकाणचे अभ्यास दौरे करत त्यांनी आधुनिक माहिती मिळवली. गेल्या सात ते आठवर्षापासून ते द्राक्षची निर्यात करत आहेत. तसेच बांधावरील केशर आंब्याचीही निर्यज्ञत गेल्या पाच वर्षापासून सुरु आहे. शेतीतील मुख्य पीक द्राक्ष असले तरी इतर क्षेत्रांमध्ये सोयाबीन, उडीद, मूग, मटकी, कांदा, ज्वारी, हरभरा, गळू, भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते.

टॅग्स :आंबाद्राक्षेशेतकरी