केल्याने होत आहे रे.. आधी केलेची पाहिजे.. या उक्तीप्रमाणे चर्चा करीत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यास नक्कीच यश मिळते. याचा प्रत्यय उमरी येथील एका शेतकऱ्याला आला. या शेतकऱ्याने एका एकरमध्ये अवघ्या तीन महिन्यात दोन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळविले आहे. इतर सर्व शेतकऱ्यांसाठी हा एक प्रेरणादायी असाच प्रयोग म्हणावा लागेल.
सध्या शेतकरी दिवसेंदिवस येणाऱ्या नैसर्गिक व मानवनिर्मित संकटामुळे आर्थिक नैराश्यात सापडलेला आहे. अशा वेळी कुठलाच पर्याय दिसत नसल्याने नैराश्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला आहे. अशा परिस्थितीत उमरी येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सचिन गळगे या शेतकऱ्याने एका एकरमध्ये काकडी या भाजीपाला फळपिकाची लागवड केली. अवघ्या तीनच महिन्यात त्यांनी दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. अवघ्या तीनच महिन्यात एका एकरमध्ये दोन लाखांची काकडी झाली. काकडी पिकाचा हंगाम संपल्यानंतर लगेच या नेट शेडमध्ये दोडका व कारला हे भाजीपाला फळपीक लागवड केली. दोडका व कारला भाजीपाला फळाच्या माध्यमातून पुन्हा अडीच ते तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे.
हेही वाचा- ताजी स्ट्रॉबेरी आता पिकतेय तुळजापुरात! १२ गुंठ्यात यशस्वी प्रयोग
शेडसाठी २१ लाखांचा खर्च
■ नानाजी देशमुख पोखरा योजनेअंतर्गत गळगे यांनी नेटशेडची बांधणी करून घेतली. या योजनेअंतर्गत जवळपास नेट- रोडसाठी २१ लाखांचा खर्च आला. त्यासाठी लग्नाला सर्व खर्च अगोदर वैयक्तिक स्वतः केला.
■ त्यानंतर शासनातर्फे ८० टक्के म्हणजेच १८ लाख रुपयांची सबसिडी मिळाली. शेतामध्ये अगोदरच विहीर तसेच बोअरची सिंचनासाठी व्यवस्था होती.