Lokmat Agro >लै भारी > लाल मिरचीच्या लागवडीतून मिळाले एकरी ३ लाखाचे उत्पन्न

लाल मिरचीच्या लागवडीतून मिळाले एकरी ३ लाखाचे उत्पन्न

An acre yield of 3 lakh per acre was obtained from the cultivation of red pepper | लाल मिरचीच्या लागवडीतून मिळाले एकरी ३ लाखाचे उत्पन्न

लाल मिरचीच्या लागवडीतून मिळाले एकरी ३ लाखाचे उत्पन्न

खर्च ८० हजाराचा उत्पादन १२ ते १३ क्विंटल..

खर्च ८० हजाराचा उत्पादन १२ ते १३ क्विंटल..

शेअर :

Join us
Join usNext

रविंद्र शिऊरकर

जगभरातील जेवणात तडक्यात वापरली जाणारी 'रेड पेपरीका'  म्हणजेच लाल मिरचीची लागवड करत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमधील शेतकऱ्याने एकरी ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

सफियाबादवाडी येथील शेतकरी लक्ष्मण जाधव यांना शेतीच्या प्रयोगांचं मोठं कुतुहल. यांची एकूण सहा एकर जिरायती शेती.  कपाशी, आद्रक, कांदे, मक्याचं पीक यंदा घेतलं .  तसेच ते विविध कृषी प्रदर्शन व कृषी विषयक माहिती सतत मिळवत  ज्यातून नवनवीन प्रयोग ते शेतात करतात. यातूनच त्यांना रेड पेपरिका या मिरची पिकाची माहिती मिळाली व २०२१ साली त्यांनी याची लागवड केली. खर्च जाऊन हमखास एक चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी त्यात सातत्य राखले व आज परिसरात १०-१५ शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या रेड पेपरीका मिरचीची शेती करत आहे. 

औषधीसाठी मिरचीची लागवड 

एका खासगी कंपनी सोबत बियाणे खरेदी ते मिरची विक्री कराराद्वारे लक्ष्मण जाधव यांनी रेड पेपरिका मिरचीचे बियाणे विकत घेत त्यापासून स्थानिक शेडनेट नर्सरीत रोपे निर्माण करून लागवड केली आहे. एकरी १८००० रोपे मल्चिंग पेपरचा वापर करत ४.६ × ०.६ या अंतरावर मिरचीची लागवड केली जाते. पाच महिन्यांच्या कालावधीत हे पीक घेतले जाते. ऑक्टोबरमध्ये लागवड होत असलेल्या मिरचीची पुढे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे  तीन तोडे निघतात. त्यानंतर सुकलेली लाल मिाची कंपनीकडून ठरलेल्या दरानुसार खरेदी केली जाते.

लागवड ते काढणी खर्च 

लागवड ते काढणी असा सरासरी ८० हजार खर्च या मिर्ची करीत एकरी येतो. ज्यात बियाणे, बियाण्यांपासून रोपे निर्मिती, शेत तयार करणे, बेड पाडणे, मल्चिंग पसरवणे, ठिबक सिंचन, तसेच नियमित ८ दिवसाला कंपणीद्वारे मिरचीची पाहणी केली जाते व त्यास आवश्यक घटकांची फवारणी सुचवली जाते त्यानुसार हप्त्याला बुरशीनाशकाची किटकनाशकांची फवारणी तसेच इतर खते व मिरचीची तोड करणे आदींचा मिळून एकरी ८० हजार खर्च येतो. 

रेड पेपरिका मिरचीतून मिळणारे उत्पन्न 

कंपनीसोबत असलेल्या करारानुसार मिरची झाडालाचं ३०% पर्यंत मिरची लाल होऊन सुकते तेव्हा तोड केली जाते. अशा तीन तोड होतात.  तोड झालेली सुकलेली लाल मिरची एकरी १२ -१३ क्विंटल मिळते. ज्याला दोन गुणवतेत्त विभागून चांगल्या दर्जाच्या मिरचीस २९५ किलो व दुय्यम दर्जाच्या मिरचीस २७० रुपये किलो असा दर मिळतो. असे एकरी ३ ते ४ लाख रुपये उत्पन्न या मिरचीमधून मिळते खर्च वजा जाता एकरी २.५ ते ३ लाख हमखास उत्पन्न रेड पेपरिका मिरचीमधून मिळत असल्याचे लक्ष्मण जाधव यांनी सांगितले.

 

Web Title: An acre yield of 3 lakh per acre was obtained from the cultivation of red pepper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.