Join us

तुरीच्या एका झाडाला सरासरी तब्बल १४०० शेंगा; निंबर्गीच्या या शेतकऱ्याने घेतले बंपर उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:06 IST

राजकारणात राहिल्याने शेतीकडे दुर्लक्ष होते, ही कल्पना निंबर्गीच्या गंगाधर बिराजदार यांनी खोटी ठरवली आहे. त्यांनी तुरीचे बंपर उत्पादन घेतले आहे.

सोलापूर : राजकारणात राहिल्याने शेतीकडे दुर्लक्ष होते, ही कल्पना निंबर्गीच्या गंगाधर बिराजदार यांनी खोटी ठरवली आहे. त्यांनी तुरीचे बंपर उत्पादन घेतले आहे.

कृषी दिनानिमित्त पुणे येथील कृषी महाविद्यालयात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविषयी गौरवोद्‌गार काढले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गीचे गंगाधर बिराजदार हे प्रयोगशील शेतकरी आहेत. द्राक्षासह ते विविध पिके घेतात. यंदाच्या खरिपात त्यांनी गोदावरी जातीच्या तुरीच्या वाणाची लागवड केली होती.

सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्याने तुरीच्या एका झाडावर साधारणपणे १२०० ते १४०० शेंगा लागल्याचे दिसून आले. संपूर्ण झाड तुरीच्या शेंगांनी लगडलेले असल्याने एकरी १४ ते १५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे.

यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ लालासाहेब तांबडे, अमोल शास्त्री, ऑजारी, कृषी सहायक अशोक राठोड यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. गंगाधर बिराजदार यांनी यापूर्वी तुरीचे विक्रमी उत्पादन घेऊन राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे.

द्राक्ष उत्पादनात ही त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. गंगाधर बिराजदार राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात. सध्या ते ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेचे संचालक आहेत. शेतीवर त्यांची अपार श्रद्धा आणि निष्ठा आहे.

कृषीमंत्र्याकडून गौरवकृषी दिनाच्या निमित्ताने पुणे येथील कृषी प्रदर्शनाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. गंगाधर बिराजदार यांनी उत्पादित केलेल्या तुरीच्या झाडाची पाहणी करून त्यांनी बिराजदार यांचा गौरव केला. त्यांना दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही गंगाधर बिराजदार यांच्या शेती बाबतची माहिती घेतली.

शेतीची आवड असेल आणि नवनवीन प्रयोग करण्याची इच्छा असेल, तर विक्रमी उत्पादन घेता येते. मला शेतीची आवड असून, त्यासाठी खूप कष्ट घेतो. तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मला। मिळत राहते. मंत्र्यांनी केलेला गौरव माझ्यासाठी प्रेरणादायक ठरेल. - गंगाधर बिराजदार, शेतकरी, निंबर्गी

अधिक वाचा: दोन्ही बहारामध्ये छाटणी घेत अंजीराचे दर्जेदार उत्पादन घेणारे शेतकरी जालिंदर डोंबे यांची यशकथा

टॅग्स :शेतकरीशेतीपीकतूररब्बीसोलापूरकृषी विज्ञान केंद्रशिवराज सिंह चौहानमंत्री