प्रशांत ननवरे
बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथील एका युवा शेतकऱ्याने विषमुक्त दुध निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. सुधीर जाधव असे या युवकाचे नाव आहे. जाधव यांनी २०१८ साली दुध व्यवसाय सुरु केला. लहान मुलांचे औषध तयार करण्यासाठी या दुधाचा वापर करण्यात येतो.
सुधीर यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षणानंतर सुरवातीला त्यांनी पोलीस भरतीचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये यश न आल्याने त्यांनी वडीलोपार्जित शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. ऊसशेतीसह दुध व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी काष्ठी (जि.नगर) येथे वास्तव्यास असणाऱ्या मामांकडुन दोन संकरीत गायी आणल्या. सुरवातीला २ कालवडींपासुन त्यांनी २०१८ मध्ये दुध व्यवसायाला सुरवात केली.
आज त्यांच्याकडे ९ गायी, ९ कालवडी आहेत. या दुधव्यवसाय करण्यासाठी त्यांना पत्नीची साथ मिळते. प्रति दिन २२० ते २२० लीटर दुध ते आर.एन.डेअरी फार्मच्या माध्यमातून सोमेश्वरनगर येथील डाॅ. सावंत यांना पुरवठा करतात. या दुधाला बाजारातील दरापेक्षा ४ रुपये लीटर दुध दर मिळतो. तालुक्यात केवळ ५ ते ६ शेतकरी अशा प्रकारच्या विषमुक्त दुधाचा पुरवठा करतात.
विषमुक्त दुधासाठी सुधीर त्यांच्या गायीला अॅंटीबायोटीक्स देत नाहीत. केवळ सकस आहार गायीला वेळेवर देण्याची दक्षता घेतात. गायींना ते मुरघास, पेंड, मिनरल मिक्सचर सकाळ संध्याकाळ प्रमाणात देतात. गायींची काळजी घेतात. जंताचा डोस वेळेवर दिला जातो. परीणामी त्यांची गाय इतर गायींच्या तुलनेत ८ ते १० लीटर दुध अधिक उत्पादन देते.
अधिक वाचा: फॅट काढण्यासाठी जादा दूध घेणाऱ्या संस्थांवर होणार कारवाई
त्यांची वडीलोपार्जित साडेतीन एकर जमीन आहे. यामध्ये ते दिड एकर मका लागवड करतात. याशिवाय सुधीर यांना नुकत्याच झालेल्या कृषक प्रदर्शनात बायीच्या दुग्धोत्पादनाची स्पर्धा पार पडली. या मध्ये सर्वाधिक दुध देणाऱ्या गायींच्या स्पर्धेत त्यांच्या गायीने एका दिवसात ५० लीटर ३०० ग्रॅम दुध देत प्रथम क्रमांक मिळाला आहे.
त्यांची स्टायकर जातीची संकरीत गाय आहे. बेंगलोर वरुन आणलेल्या गायीपासुन हि कालवडीची पैदास झाली आहे. चांगल्या दर्जाचे सीमेन वापरुन त्यांनी चांगल्या गायीची पैदास केली आहे. योग्य आहाराच्या बळावर त्यांची गाय प्रतिदिन ५० ते ५१ लीटर दुध देत आहे. इतर गायींपेक्षा ८ ते १० लीटर दुध देते. शेतकऱ्यांना सल्ला देताना सुधीर जाधव म्हणाले, दुध व्यवसाय काटेकोरपणे केल्यास परवडतो. दुध व्यवसाय चांगला आहे. मात्र, त्यासाठी नियोजन आवश्यक आहे.