Lokmat Agro >लै भारी > माळरानावरील खट्टा-मिठ्या अंजीराची कहाणी; शेतकऱ्याची अंजीररत्न पुरस्कारासाठी वर्णी

माळरानावरील खट्टा-मिठ्या अंजीराची कहाणी; शेतकऱ्याची अंजीररत्न पुरस्कारासाठी वर्णी

Anjiraratna Deepak bloomed sweet and sour figs farming on 8 acres in nimbut village | माळरानावरील खट्टा-मिठ्या अंजीराची कहाणी; शेतकऱ्याची अंजीररत्न पुरस्कारासाठी वर्णी

माळरानावरील खट्टा-मिठ्या अंजीराची कहाणी; शेतकऱ्याची अंजीररत्न पुरस्कारासाठी वर्णी

निंबुतच्या टेकडावरील माळरानावर बहरले अंजीर पिक; संत्री, मोसंबी, डाळिंब पिकांतून नुकसान सोसले अन जगताप बंधू अंजीर पिकाकडे वळले. संत्री, मोसंबी, डाळिंब पिकांतून नुकसान सोसले अन जगताप बंधू अंजीर पिकाकडे वळले.

निंबुतच्या टेकडावरील माळरानावर बहरले अंजीर पिक; संत्री, मोसंबी, डाळिंब पिकांतून नुकसान सोसले अन जगताप बंधू अंजीर पिकाकडे वळले. संत्री, मोसंबी, डाळिंब पिकांतून नुकसान सोसले अन जगताप बंधू अंजीर पिकाकडे वळले.

शेअर :

Join us
Join usNext

महेश जगताप
सोमेश्वरनगर : शेतकरी आता पारंपारिक पिकांना सोडून नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. औषधी वनस्पतींच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नात असलेले सरकार पारंपारिक पिकांव्यतिरिक्त नवीन पर्याय निवडण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे.

हेच कारण आहे की आज औषधी वनस्पतींच्या लागवडीचा कल वाढत आहे. अंजीर ही एक अशीच औषधी वनस्पती आहे, ज्याची व्यावसायिक शेती आता मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहेत. कमी खर्चामुळे आणि जास्त काळजी घ्यावी लागत नसल्यामुळे हा शेतकऱ्यासाठी एक विनिंग पॅच ठरत आहे.

अंजीराची एक चांगली गोष्ट म्हणजे एकदा लागवड केल्यास शेतकऱ्यांना कमीतकमी ३० वर्षे पर्यंत उत्पादन मिळू शकेल. या कारणास्तव अंजीराच्या शेतीत अधिक नफा उपलब्ध आहे. निंबुत (ता. बारामती) येथील दीपक जगताप यांना ऐकून १० एकर शेती त्यातील आठ एकर माळरान सुरुवातीच्या काळात संत्री, मोसंबी व डाळिंब अशा पिकांतून नुकसान सोसावे लागले.

मात्र दीपक यांनी शेतीची जिद्द सोडली नाही. त्याच खडकाळ जमिनीत अंजीराची शेती केली. आज ह्याच अंजिराला भारतातल्या अनेक राज्यांमधून बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

बारामती तालुक्यातील निंबुत गावाच्या दीपक जगताप यांच्या अंजीर शेतीची ही यशोगाथा दीपक अगताप यांचे आठ जणांचे कुटुंब वडिलोपार्जित शेती असल्याने शेतीची आवड त्यांना पहिल्यापासूनच होती.

एकूण दहा एकर शेती आठ एकर शेती टेकडावरील माळरानावर होती. चार एकर शेती चालू व बाकी पडीक होती. त्या चार एकरावरती ऊस कडधान्य भूसार अशाप्रकारे पिके घेत वीर धरणाच्या कालव्याजवळ असणाऱ्या विहिरीतून दोन किलोमीटर अंतरावरील माळरानावर पाणी आणले.

शेती करायची पण काहीतरी वेगळे करायची या उद्देशाने दीपक जगताप हे फळबागेकडे वळाले. २००६ साली संत्रा, मोसंबी, डाळिंब, अंजीर ही चार पिके एक एक एकरावर केली. उसाच्या पट्ट्यात फळपिकाला लोकांचा विरोध होऊ लागला, बाजारभाव न मिळाल्याने काही वर्षात ती काढावी लागली. डाळिंब चांगले आले. बाजारभाव ही चांगला भेटू लागला पण तेल्या व मर रोग वाढल्याने डाळिंब सुद्धा काढावे लागले.

अन् फळबाग फुलवली
अंजीर पीकातून देखील चार पाच वर्षात म्हणावे असे उत्पन्न देत नव्हते. मात्र जगताप यांनी इतक्यावर खचून न जाता अंजीर पीक हे चांगले आणायचेच हा निश्चय ठेवला. यश मिळवायचेच मनाशी खूप गाठ बांधली, बऱ्याच अंजीर शेतकऱ्यांच्या बागेस भेटी देण्यास जाऊ लागले म्हणावे असे मार्गदर्शन भेटले नाही, आपण कुठे चुकतोय आपण खतांचे औषधांचे छाटणीचे व्यवस्थापन कसे करतोय ह्याचा अभ्यास केला. त्यानंतर हळूहळू, अंजीर पिकामध्ये त्यांना यश येऊ लागले, एक एकर बागेपासून आज त्यांच्याकडे आठ एकर अंजीर लागवड आहे.

नोकरी सोडली अन् शेती केली
दीपक जगताप यांचा मोठा भाऊ गणेश हे देखील २०१५ साली पुण्यातील नोकरी सोडून शेतीकडे वळाले. त्यांनाही शेतीची आवड होती हे सर्व करत असताना त्यांना सर्व कुटुंबियांची खूप साथ मिळाली. आज या पिकात भरभरून यश मिळू लागले हे पाहून अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संघाने २०१८ साली खासदार शरद पवार यांच्या हस्ते अंजीरत्न पुरस्कार दिला आहे.

त्यानंतर अनेक मान्यवरांच्या कृषी खात्याच्या, केवीकेच्या, विद्यापीठाच्या, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तसेच कर्नाटक तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या भेटी अंजीर फळबागेस होऊ लागल्या.

आज जमेल तसे अंजीर फळ पिकाचे मार्गदर्शन दीपक व गणेश हे दोघे भाऊ घेत राहिले. या आठ एकर अंजीर पिकामध्ये बारा महिन्यातील नऊ महिने म्हणजेच ऑक्टोबर ते जून या कालावधीत हार्वेस्टिंग चालू राहते.

खट्टा आणि मीठा असे दोन्ही बहर घेतले जातात. त्यामुळे पंधरा ते वीस पारधी समाजातील कुटुंबियांना रोजगार ही उपलब्ध झाला आहे. ह्याचे मार्केटिंग मुंबई कोल्हापूर हैदराबाद सुरत बेंगलोर अशा ठिकाणी होते. संपूर्ण देश व जगभरात कसे मार्केटिंग करता येईल, त्याचे काम चालू आहे.

अधिक वाचा: दुष्काळी भागात आल्याचा प्रयोग; १४ गुंठे आल्यातून छप्परफाड कमाई

Web Title: Anjiraratna Deepak bloomed sweet and sour figs farming on 8 acres in nimbut village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.