Lokmat Agro >लै भारी > Bangalore Zendu Farming : इगतपुरीच्या शेतकऱ्याने फुलवला बंगलोरचा झेंडू, दसरा, दिवाळीत तीन लाखांचे उत्पन्न

Bangalore Zendu Farming : इगतपुरीच्या शेतकऱ्याने फुलवला बंगलोरचा झेंडू, दसरा, दिवाळीत तीन लाखांचे उत्पन्न

Banglor Zendu Farming: Igatpuri Farmer Grows Bangalore Zendu Farming, Dussehra, Diwali Income of Three Lakhs | Bangalore Zendu Farming : इगतपुरीच्या शेतकऱ्याने फुलवला बंगलोरचा झेंडू, दसरा, दिवाळीत तीन लाखांचे उत्पन्न

Bangalore Zendu Farming : इगतपुरीच्या शेतकऱ्याने फुलवला बंगलोरचा झेंडू, दसरा, दिवाळीत तीन लाखांचे उत्पन्न

Bangalore Zendu Farming : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील शेतकऱ्यास बंगलोर झेंडू (Bangalore Zendu) शेतीतून चांगले उत्पन्न मिळाले आहे.

Bangalore Zendu Farming : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील शेतकऱ्यास बंगलोर झेंडू (Bangalore Zendu) शेतीतून चांगले उत्पन्न मिळाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Bangalore Zendu Farming : यंदाच्या दिवाळी (Diwali 2024) फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली फायद्याची ठरली. अनेक शेतकऱ्यांना इतर पिकांच्या तुलनेत फुल शेतीतून चांगले उत्पन्न मिळाले. यात नाशिक जिल्ह्यातील (Nashik) इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील शेतकऱ्यास चांगले उत्पन्न मिळाले आहे. जवळपास एक एकर क्षेत्रावर बंगलोर झेंडू शेतीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. 

दिवाळी दसरा म्हणजे एक पर्वच असतो. यादिवशी झेंडूच्या फुलांना (Zendu) बाजारात प्रचंड मागणी असते. याच हेतूने साकुर येथील शेतकरी उत्तमराव सहाणे बंगलोर झेंडूच्या अक्षदा यलो या वाणाची लागवड करत उत्पन्न मिळवले आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकरी या दिवसांत फुलांची लागवड करीत असतात. शेतकरी उत्तमराव सहाणे यांनी झेंडू अक्षदा यलो या वाणाची एक एकर क्षेत्रात लागवड केली आहे. लागवडीपासून त्यांना तीन लाखाचे उत्पन्न मिळाले असून अजून 50 हजाराचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे सहाणे यांनी सांगितले. 

सुरवातीला सहाणे यांनी नर्सरीतून रोप आणून दसरा दिवाळीसाठी लागवड केली होती. कारण या दिवसात फुलांना प्रचंड मागणी असते. व्यापारी देखील या फुलासाठी अगोदरच मागणी करतात. सहाणे यांनी लावलेल्या बंगलोर झेंडू फुले अतिशय घट्ट असुन वजनदार आहेत. साधारण 30 ग्रॅम वजनाची फुले असून आकर्षक कलर आहे. शिवाय अतिपावसात पण हे वाण तग धरून राहते, करपा रोगात अतिशय सहनशील वाण असल्याचे सहाणे  
 
इगतपुरी तालुक्यात पारंपरिक शेतीला प्राधान्य दिले जाते. मात्र मागील वर्षांत फुलशेती बहरू लागली आहे. मागील दोन वर्षांपासून फुलशेती करत आहोत. तयातून चांगला नफाही मिळत आहेत. आम्ही बंगलोर झेंडूला प्राधान्य दिले. शेतकरी बांधवांनी या वाणाची लागवड करावी. जेणेकरून पावसात तग धरणारे वाण असल्याने नुकसान कमी होते. 
- उत्तमराव सहाणे, शेतकरी, इगतपुरी 

हेही वाचा : Youth Farmer Success Story : कृषी पदवीधारक युवा शेतकऱ्याचा सेंद्रीय झेंडू फुलशेतीचा यशस्वी प्रयोग

Web Title: Banglor Zendu Farming: Igatpuri Farmer Grows Bangalore Zendu Farming, Dussehra, Diwali Income of Three Lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.