प्रशांत ननवरे
बारामती तालुक्यात निरा डावा कालव्याच्या पाण्यावर बहुतांश शेतकरी ऊसशेतीला प्राधान्य देतात. मात्र, पिंपळी (ता. बारामती) गावातील दोघा उच्चशिक्षित भावंडांनी एकत्र येत ऊसाच्या पट्टयात विषमुक्त द्राक्ष बाग लागवडीचा प्रयोग केला आहे. सतीश बापूराव देवकाते व दीपक आबासाहेब देवकाते अशी या भावंडांची नावे आहेत.
देवकाते कुटुंब एका विचाराने शेती करतात त्यासाठी त्यांनी शेतात लागवडीबाबत विविध ठीकाणी भेट देत माहिती घेण्यास सुरवात केली, त्यांनी बोरी (ता. इंदापुर) आणि फलटण धुमाळवाडी येथील आर.के या द्राक्षाच्या वाणाच्या बागांची माहिती घेतली. माहिती घेऊन अभ्यास करून द्राक्ष पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला, आर. के. व्हाईट व्हरायटीला पॉईंट चांगला असल्याने ही व्हरायटी लावायचा निर्णय घेतला, मात्र या लागवडी बाबत व त्याच्या देखभाली संदर्भात माहिती नसल्याने द्राक्षाची आर.के. व्हरायटीचे निर्माते सांगली येथील रघुनाथ केदारी यांच्याकडून माहिती जाणून घेतली, लागवडीपासून पीक काढणी पर्यंतची इत्यंभूत माहिती केदारी यांच्याकडून जाणून घेतली.
अधिक वाचा: रशियन झाले फिदा; आटपाडीच्या डाळिंबाचा सातासमुद्रापार डंका
गेल्या पाच वर्षापूर्वी द्राक्ष बागेची लागवड केली. इंटरनेटवर सर्च करून व वेगवेगळ्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी संपर्क केला, तसेच द्राक्ष निर्यात करण्यासाठी विषमुक्त द्राक्षलागवडीचा प्रयोग केला. मागील वर्षी त्यांनी स्पेन, युरोप, जर्मनी, दुबईसह आदी भागातून आलेल्या मागणीनुसार निर्यात केली, सध्या चालू हंगामात पश्चिम बंगालला द्राक्ष निर्यात केली. तसेच स्थानिक बाजारपेठेत देखील द्राक्ष विक्री केल्याचे दिपक देवकाते यांनी सांगितले तसेच विषमुक्त द्राक्षासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे देखील त्यांनी सांगितले.
आदर्शवत शेती प्रयोग
एका बाजूला अनेक संकटांमुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडत असताना, दुसऱ्या बाजूला निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करून येथील शेतकऱ्यांनी आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी विषमुक्त द्राक्षे केवळ परदेशी निर्यात केली नाहीत तर चालू बाजारभावापेक्षा दुप्पट रक्कम प्रतिकिलो पाठीमागे मिळवली आहे. त्यामुळे प्रतिकूल परीस्थितीमध्ये दिशा देण्यासाठी त्यांची शेती आदर्शवत ठरत आहे.