पारंपरिक शेतीला फाटा देत लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील एका शेतकऱ्याने एक एकरमध्ये बॉबी जातीच्या खरबुजाची लागवड केली आहे. पंधरा दिवसांत हे फळ आता मार्केटला जाणार असून, यातून किमान सहा ते सात लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील काही वर्षात शेतकरी बेभरवशाची झाली असल्याची भावना बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. अनेकदा एखाद्या पिकावर केलेला खर्चदेखील शेतकऱ्याच्या पदरात पडत नसल्याचे दिसून येते. यामुळे शेतकरी कायम कर्जाच्या ओझ्याखाली राहत आहे. नापिकी, वाढते कर्ज यामुळे अनेक शेतकरी लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील संतोष गवळी यांच्या बागेत असे खरबूज लगडले आहेत.
आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्राही संपवितात; परंतु, तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील शेतकरी संतोष विष्णू गवळी यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीसाठी पुढाकार घेतला आहे. गवळी यांनी अवघ्या एक एकरमध्ये बॉबी या जातीच्या खरबुजाच्या सहा हजार रोपांची लागवड केली आहे. रोप, लागवड मल्चिंग, ड्रीप, खत, फवारणी, मजुरी यासाठी त्यांनी आजवर एकूण एक लाख रुपये खर्च केला. आता १५ दिवसांत हे खरबूज विक्रीस मार्केटला जाणार आहेत. सध्याचा बाजारभाव ४० रुपये प्रति किलो असून, हाच भाव कायम राहिला तर या उत्पादनातून किमान सहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे गवळी यांनी सांगितले आहे.
गतवर्षी मिरचीतून मिळाले चार लाख
हिप्परगा (रवा) येथील शेतकरी संतोष गवळी यांना चार एकर शेती आहे. त्यात विहिर, बोअर घेतले असून, याला मुबलक पाणी आहे. यात ते ऊस, ज्वारी ही पिके घेतात. दरम्यान, पाणी मुबलक असल्याने काही तरी वेगळा प्रयोग केला पाहिजे, या उद्देशाने गतवर्षी त्यांनी एक एकरमध्ये मिरचीची लागवड केली होती. यातून त्यांना चार लाख रुपयांचे उत्पन्न झाले. यावर्षी त्यांनी स्वरबूज लागवडीचा प्रयोग यशस्वी केला असून, यातून अवघ्या तीन महिन्यांत त्यांना सहा ते सात लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.