Join us

चार हजार फुटांवरून पाणी आणून दुष्काळी गावात फुलवली मिरचीची शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 2:53 PM

खेड तालुक्यातील आदिवासी भागातील दुष्काळी गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नायफड येथील मारुती सोमा तिटकारे यांनी २० गुंठे क्षेत्रात मिरची लागवडीतून आतापर्यंत केलेल्या तोडीत दोन लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे.

खेड तालुक्यातील आदिवासी भागातील दुष्काळी गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नायफड येथील मारुती सोमा तिटकारे यांनी २० गुंठे क्षेत्रात मिरची लागवडीतून आतापर्यंत केलेल्या तोडीत दोन लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. सर्व खर्च वजा होता चौथ्या तोड्यातच लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

आणखी पाच-सहा तोडे होणार असल्याने तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी तिटकारे यांची अपेक्षा आहे. धाबेवाडी-नायफड-डेहणे रस्त्यावरील आपल्या शेतीत मारुती तिटकारे आणि त्यांची पत्नी मालती तिटकारे या दाम्पत्याने पारंपरिक पिके टाळत, शिवाय पश्चिम भागात अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सामना करावा लागतो.

त्यामुळे शेतीतून उत्पादनखर्चही हाती येत नसल्याने त्यांनी नवीन वाण निवडत मिरची लागवड करण्याचे ठरवले; पण प्रश्न होता पाण्याचा, गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि शेतीसाठी तर शक्यच नव्हते.

अशाही परिस्थितीत चार हजार फूट लांब डोंगरावर असलेल्या श्री श्री रविशंकर यांनी बांधलेल्या बंधाऱ्यातून या दाम्पत्याने अहोरात्र कष्ट करत पाइपलाइन टाकून सायफन पद्धतीने आपल्या शेतापर्यंत पाणी आणून मिरची लागवड करण्याचे ठरवले.

भगीरथ प्रयत्नानंतर मिळाले यश- या दाम्पत्याने अहोरात्र कष्ट करत एक-एक पाइप जोडत डोंगराच्या कडेकडेने कधी दगडांचा अडथळा, तर कधी झाडांचा अडथळा दूर करत सायफन पद्धतीने आपल्या शेतापर्यंत पाइपलाइन आणली.या भगीरथ प्रयत्नानंतर ३९ डिसेंबरला नववर्षाच्या सुरुवातीलाच त्यांच्या या प्रयलाला यश आले आणि बंधाऱ्याचे पाणी शेतीमध्ये वाहू लागले. सर्व गावाने त्यांच्या या प्रथलांना शाबासकी दिली आणि कौतुकही केले.

नायफड म्हणजे कायम पाण्याची परवड असलेले आदिवासी गाव. आमच्याकडे कायम पाण्याची टंचाई: त्यामुळे शेती दूरच. लांब दिसणारा डोंगरावरचा बंधारा आम्हांला खुणावत होता. आम्ही ठरवले, त्याचं पाणी शेतीपर्यंत आणून शेती करायची. मी आणि माझी पत्नी व बंधूंनी प्रयल करून घेतलेला निर्णय पूर्ण केला. आज आमच्या मिरचीच्या शेतीतून किती पैसे मिळाले, यापेक्षा दुरून आलेल्या पाण्याचा आम्ही शेतीमध्ये रूपांतर करू शकलो, याचे समाधान आहे. - मारुती तिटकारे, शेतकरी, नायफड

अधिक वाचा: पारगावचे वाघ बंधू कारल्याची शेतीतून काढता आहेत मधुर फायदा

टॅग्स :शेतकरीशेतीपाणीमिरचीपीकपीक व्यवस्थापनभाज्या