Lokmat Agro >लै भारी > कपाशीला फाटा देत तुरीची लागवड करून लाखोंची कमाई करणाऱ्या तरूणाची यशोगाथा

कपाशीला फाटा देत तुरीची लागवड करून लाखोंची कमाई करणाऱ्या तरूणाची यशोगाथा

chhatrapati sambhajinagar young farmer success story fron tur cotton crop | कपाशीला फाटा देत तुरीची लागवड करून लाखोंची कमाई करणाऱ्या तरूणाची यशोगाथा

कपाशीला फाटा देत तुरीची लागवड करून लाखोंची कमाई करणाऱ्या तरूणाची यशोगाथा

तुर पिकांतून शेतकऱ्याला मिळाले भरघोस उत्पन्न 

तुर पिकांतून शेतकऱ्याला मिळाले भरघोस उत्पन्न 

शेअर :

Join us
Join usNext

- रविंद्र शिऊरकर 

कपाशीला फाटा देत तूर लागवड करत छत्रपती संभाजीनगर मधील शेतकऱ्याने चांगले उत्पन्न मिळवले असून सोबत कपाशीपेक्षा तुरीमध्ये त्यांना खर्चही कमी लागला आहे.
 
कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील शेतकरी अक्षय झाल्टे यांना वडिलोपार्जित ३५-४० एकर शेती आहे. तर काही शेतजमीन ही शिवना टाकळी धरणात गेलेली. पारंपरिक ऊस, कांदा, कपाशी, मका अशी पिके ते घेतात. ज्यात तूर अवघी एक दोन एकर असायची. मात्र, अक्षय यांनी बीएसस्सी ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर व परभणी कृषी विद्यापीठ तसेच बदनापूर कृषी विज्ञान केंद्राचे बियाणे वाटप केंद्र छ्त्रपती संभाजीनगर यांना वेळोवेळी भेटी दिल्या. 

भेटीतून बदनापूर कृषी विज्ञान केंद्राचे संशोधित तूर वाण असलेल्या BDN 711 या तूरीविषयी माहिती मिळाली. कपाशीला लागणारा खर्च, वेचणीच्या वेळेस होणारी हेळसांड या सर्वांचा विचार करता त्यांनी २०१९ मध्ये प्रथमता प्रयोग म्हणून सात एकर तुरीची लागवड केली. उत्पन्न चांगले मिळाले सोबत खर्चही कमी आला. पुढे २०२०, २०२१ आणि २०२२ मधील पिकांतून मिळणाऱ्या अनुभवातून शिकत सध्या अक्षय हे तुरीत प्रगत झाले असून सोबत चांगले उत्पन्न मिळवत आहे. 

या वर्षीचे तूर व्यवस्थापन व उत्पन्न 

या वर्षी साडे पाच एकर क्षेत्रावर झाल्टे यांनी तुरींची लागवड केली होती. लागवडीसाठी ६ बाय २ या पद्धतीचा वापर केला होता. लागवडीनंतर ४५ दिवसांनी शेंड्यांची छाटणी करून किटकनाशक, बुरशीनाशक व सुष्म अन्नद्रवांची फवारणी घेतली. जनावरांना चांगले भुस मिळावे म्हणून मजुराच्या मदतीने तुरीची पारंपरिक पद्धतीने काढणी केली. या सर्वांत शेत तयार करणे, निर्विष्ठा, लागवड, काढणी असा साडेपाच एकरात सरासरी एक लाख रुपये खर्च आला असून ६४ क्विंटलचे उत्पादन त्यांना झाले. हंगामाच्या सुरुवातीला विक्री केल्याने ८९०० रुपये बाजारदर मिळाला. ज्यातून खर्च वजा जाता त्यांना चार लाख साठ हजारांचा नफा मिळाला. 

खर्चाच्या तुलनेत कपाशीला तूर सरस 

अलीकडे कपाशी पिकावर रसशोषण अळींचा व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून वारंवार फवारणी घ्यावी लागते. खर्च वाढून उत्पादन घटले आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांनी कपाशी सोबत तूर लागवड क्षेत्र वाढवावे असे आकाश झाल्टे सांगतात.

Web Title: chhatrapati sambhajinagar young farmer success story fron tur cotton crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.