Join us

द्राक्ष पिकाला फाटा देत देशमुखांनी केली ड्रॅगन फ्रूटची लागवड वर्षाला करतायत आता इतकी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 1:59 PM

वांगी (ता. कडेगाव) येथील शेतकरी राजेंद्र किसन देशमुख यांनी ड्रॅगन फ्रूटची लागण केली. यातून त्यांना एकरी ८ ते १० लाख रुपयांचे वर्षाला उत्पन्न मिळत आहे. एकदा लागणीसाठी खर्च न केल्यानंतर २० वर्षे उत्पन्न मिळत आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

मोहन मोहितेवांगी : पारंपरिक शेती व निर्सगाच्या बदलामुळे द्राक्षे बागेवर होणारा परिणाम तसेच सतत व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या दराच्या चड-उताराला शेतकरी वैतागले आहेत.

यातूनच वांगी (ता. कडेगाव) येथील शेतकरी राजेंद्र किसन देशमुख यांनी ड्रॅगन फ्रूटची लागण केली. यातून त्यांना एकरी ८ ते १० लाख रुपयांचे वर्षाला उत्पन्न मिळत आहे. एकदा लागणीसाठी खर्च न केल्यानंतर २० वर्षे उत्पन्न मिळत आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, ड्रॅगन फ्रूट शेतीची माहिती घेण्यासाठी गुजरात येथील वलसाड या गावाला भेट दिली. ड्रॅगन फूट बाबत तेथील शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.

शेतीची बारकाईने पाहणी केली व नेमके हे पिकाचे व्यवस्थापन कसे करावे लागते? आदींची माहिती जाणून घेतली. तेव्हा त्यांनी निश्चय केला की आपण देखील आपल्या स्वतःच्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड करून चांगले उत्पादन घ्यायचे.

तेव्हा त्यांनी ड्रॅगन फ्रूट लागवडीचा निर्णय घेतला व सुरुवातीला फक्त एकर क्षेत्रामध्ये प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक शेतीतून आर्थिक उत्पन्न मिळणे दुरापास्त होत होते.

राजेंद्र देशमुख यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती फुलवली इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला. सुरुवातीला एक एकर पासून सुरुवात करून त्यांनी ड्रॅगन फ्रूट लागवडीचे क्षेत्र दोन एकरवर नेऊन ठेवले आहे.

ड्रॅगन फूटची रोपे वलसाड (गुजरात) मधून आणली होती. एकरी चार ते पाच लाख रुपये खर्च आला होता. मात्र आता वीस वर्ष या बागेतून चांगली उत्पन्न मिळणार आहे. ड्रॅगन फ्रूटपासून एकरी ८ ते १० लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळत आहे.

४० एकरांवर ड्रॅगन फ्रूट● ड्रॅगन फ्रूटमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट, फायबर आणि क जीवनसत्व असल्याने हे आरोग्यदायी फळ आहे.● २ त्यामुळे बाजारात चांगला दर कायम मिळत असतो. ही शेती कमी खर्चात चांगलं उत्पन्न देते.● वांगी येथे ४० एकर क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन शेतकरी घेत आहेत.

टॅग्स :फलोत्पादनफळेशेतकरीशेतीसांगली