मेहरून नाकाडेपदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता धरणीमातेची सेवा करण्याचा निर्णय लांजा तालुक्यातील भडे गावच्या सुधीर आत्माराम तेंडुलकर यांनी घेतला. २५ एकर क्षेत्रामध्ये त्यांना आंबा, काजू, नारळ लागवड केली आहे.
बागायतीमध्ये आंतरपीक म्हणून मिरची, वांगी, भाजीपाला लागवड करत आहेत. सुधीर तेंडुलकर यांनी मागील अनेक वर्ष गावचे प्रथम नागरिक म्हणून सेवा बजावली आहे. शासकीय योजना राबवत असताना समाजातील तळागाळातील घटकापर्यंत त्याचा लाभ मिळावा, यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत.
'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्रीवर त्यांचा भर असल्यामुळे आंबा, काजू, भाजीपाला, नारळाची विक्री करत आहेत. काजू बिला चांगला दर पाहून विक्री करत आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. आंबा, लिंबू, मिरचीचे लोणचे तयार करून विक्री करत आहेत.
शेतमाल उत्पादन घेत असताना सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्याकडे त्याचा कल अधिक आहे. सुधीर यांचे भाऊ संदेश, वहिनी, पुतण्या सर्वेश यांचा स्वतःचा केटरिंग व्यवसाय असून शेतीच्या कामात मदत होत आहे.
व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती केली तर नक्कीच फायदा होतो. शासनाने 'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्रीला प्रोत्साहन देत स्वतःच शेतमालाची विक्री करतात. त्यांच्याकडे शेतमालाचा दर्जा चांगला असल्यामुळे मुंबई, पुण्यातील ग्राहकांकडून थेट मागणी करण्यात येते.
त्याप्रमाणे ते शेतमाल पाठवतात. शेतमाल पाठविण्यापूर्वीच ग्राहकही सुधीर यांच्यावर विश्वास ऑनलाइन पैसे वर्ग करीत आहेत. दर्जा राखण्यात यश आल्यामुळेच सुधीर यांना खरेदी-विक्रीत यश आले आहे. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही या प्रकारे शेतमाल विक्रीचा फंडा अवलंबण्यास सांगत आहेत.
२५ एकर क्षेत्रात त्यांनी ४२५ आंबा, ४५० काजू, २५ नारळ झाडांची लागवड केली आहे. जमिनीची विभागणी करून झाडांची लागवड केली असून आता तर उत्पादनही सुरू झाले आहे.
सेंद्रिय खतनिर्मितीबागेतील पालापाचोळा, घरातील ओला कचरा तसेच गोमूत्र, शेण याचा वापर करून कंपोस्ट खतनिर्मिती युनिट बागेतच सुरू केले आहे. सेंद्रिय खताचाच वापर शेतीसाठी करत आहेत. आवश्यकता भासल्यास रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. सेंद्रिय खतामुळे कलमांची वाढ उत्कृष्ट झाली आहे.
सामाजिक कार्यसुधीर यांना सामाजिक कार्याची आवड पूर्वीपासूनच आहे. गावचे सरपंच पद कित्येक वर्ष भूषवताना सेवेकडे दुर्लक्ष केले नाही. पदावर बाजूला झाले असले तरी त्यांचे सामाजिक कार्य सुरूच आहे. शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करतात.
शेतीची सुरुवातीपासूनच आवड असल्यामुळे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करण्याऐवजी शेतीला प्राधान्य दिले. शेतीचे काम करत असतानाच मला गावचा प्रथम नागरिक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. शासकीय योजना राबवत असताना, त्या तळागाळातील घटकापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. त्या प्रमाणेच शेती करत असताना कृषी विभागाच्या विविध योजना तसेच खत, बियाणे निवड, लागवड ते उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. परंतु कृषितज्ज्ञ संदीप डोंगरे यांचे मी सतत मार्गदर्शन घेतो, याचीही माहिती शेतकऱ्यांना देत असतो. - सुधीर तेंडुलकर, भडे
अधिक वाचा: Drumstick १६ गुंठे शेवग्याची शेती आंतरपिकातुनही केली अधिकाची कमाई