Join us

ढवळे बंधूंनी मारली बाजी, हंगामात पहिल्यांदाच द्राक्ष आणून दहा गुठ्यांत सहा लाखांचे उत्पादन

By शरद जाधव | Published: October 04, 2023 9:21 AM

कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील ढवळे बंधूंनी केला असून, यंदाच्या हंगामातील पहिली द्राक्षे त्यांनी बाजारात आणली आहेत. नंदकुमार ढवळे व विकास ढवळे यांनी उत्पादित केलेल्या द्राक्षांना प्रती चार किलो ५०१ रुपयांचा दर मिळवून त्यांनी बाजी मारली आहे.

बदलते पाऊसमान, वातावरणातील चढउतारालाही आव्हान देत शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. असाच धाडसी प्रयोग कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील ढवळे बंधूंनी केला असून, यंदाच्या हंगामातील पहिली द्राक्षे त्यांनी बाजारात आणली आहेत. नंदकुमार ढवळे व विकास ढवळे यांनी उत्पादित केलेल्या द्राक्षांना प्रती चार किलो ५०१ रुपयांचा दर मिळवून त्यांनी बाजी मारली आहे. त्यांनी घेतलेल्या १० गुंठ्यांमध्ये सहा लाखांहून अधिकचे उत्पादन त्यांना मिळणार आहे.

जिल्ह्यातील नियमित द्राक्ष हंगामास नोव्हेंबरपासून सुरुवात होते. एप्रिलपर्यंत जिल्हाभरातील द्राक्षे संपूर्ण देशासह परदेशातही जात असतात. मात्र, नियमित छाटणीपेक्षा आगाप छाटणी घेऊन सगळ्यात अगोदर द्राक्षे बाजारात आणणे खूप जोखमीचे काम औषधासह पिकासाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, योग्य व्यवस्थापन आणि फळाची काळजी घेत कोंगनोळी येथील ढवळे यांनी द्राक्षे बाजारात आणली आहेत. जिल्ह्यातील ही पहिलीच द्राक्षे आहेत. दक्षिण भारतातील बाजारपेठेत ही द्राक्षे जाणार आहेत.

दहा गुठ्यांत सहा लाखांचे उत्पादन५०१ रुपये प्रती चार किलो दर मिळालेल्या या द्राक्षबागेच्या प्लॉटचे १० गुंठे क्षेत्र आहे. यातून ढवळे यांना सहा लाखांहून अधिकचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. २०१९ मध्येही त्यांनी याच प्लॉटमधून १० गुंठ्यामध्ये पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.

दराचा विक्रम जिल्ह्यातचगत आठवड्यात सांगोला तालुक्यातून एका शेतकऱ्यानेही दाक्षे बाजारात आणली. त्यांना ४५१ रुपयांचा दर मिळाला. मात्र, सांगली जिल्ह्यात सर्वात प्रथम दाक्षे आणि ५०१ रुपयांचा दर ढवळे यांना मिळाला आहे.

जूनमध्ये छाटणी आणि नियोजनढवळे यांनी ३० जून रोजी फळछाटणी घेतली होती. त्यानुसार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचा माल बाजारपेठेत जाण्यासाठी तयार झाला आहे. रविवारी बेळंकी येथील व्यापाऱ्याने हा द्राक्षमाल खरेदी केला असून, तो चेन्नई, हैदराबाद बाजारपेठेत जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या धाडसाला सलाम आणि दादवातावरणात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेणे आव्हानात्मक ठरत आहे. हेच आव्हान स्वीकारत ढवळे यांनी आगाप छाटणी तर घेतलीच शिवाय चांगले उत्पादन मिळवून दाखवले. रुपयांचा दर मिळाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनीही त्यांचे अभिनंदन करत प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले.

टॅग्स :शेतकरीसांगलीफळेबाजारपीकशेती