Lokmat Agro >लै भारी > वाणेवाडीच्या दिग्विजयने उसाला फाटा देत केली या पिकाची लागवड घेतले ८० टन उत्पादन

वाणेवाडीच्या दिग्विजयने उसाला फाटा देत केली या पिकाची लागवड घेतले ८० टन उत्पादन

Digvijay from Vanewadi stop the sugarcane and cultivated this crop, yielding 80 tons | वाणेवाडीच्या दिग्विजयने उसाला फाटा देत केली या पिकाची लागवड घेतले ८० टन उत्पादन

वाणेवाडीच्या दिग्विजयने उसाला फाटा देत केली या पिकाची लागवड घेतले ८० टन उत्पादन

निरा खोऱ्यातील बारामती तालुक्यातील बागायत पट्टा तसा ऊस शेतीसाठी ओळखला जातो. मात्र ऊस शेतीला फाटा देत वाणेवाडी (ता. बारामती) येथील दिग्विजय जगताप या शेतकऱ्याने दोन एकर पपई पिकातून लाखांचा फायदा मिळवला आहे.

निरा खोऱ्यातील बारामती तालुक्यातील बागायत पट्टा तसा ऊस शेतीसाठी ओळखला जातो. मात्र ऊस शेतीला फाटा देत वाणेवाडी (ता. बारामती) येथील दिग्विजय जगताप या शेतकऱ्याने दोन एकर पपई पिकातून लाखांचा फायदा मिळवला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महेश जगताप
निरा खोऱ्यातील बारामती तालुक्यातील बागायत पट्टा तसा ऊसशेतीसाठी ओळखला जातो. मात्र ऊसशेतीला फाटा देत वाणेवाडी (ता. बारामती) येथील दिग्विजय जगताप या शेतकऱ्याने दोन एकर पपई पिकातून लाखांचा फायदा मिळवला आहे.

दरवर्षी ऊस पिकावर ऊस पीक घेतल्याने रानाचा पोत खराब होत चालला आहे. त्यात शेती पिकाला असलेला अनिश्चित दर त्यामुळे बागायती पट्टयातील शेतकरी हा नविननवीन प्रयोग राबवत असतो. वाणेवाडीचे दिग्विजय धन्यकुमार जगताप यांना ऐकून ४५ एकर क्षेत्र. त्यातील साडेचार एकरावर जगताप यांनी पपई शेतीचा प्रयोग राबविला.

सुरुवातीला २०२२ ला त्यांनी दोन एकर क्षेत्रावर पपई करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परंडा येथून १५ नंबर जातीचे अडीच हजार पपईचे रोप विकत आणले. तत्पूर्वी शेणखत खालून नांगरणी-काकरणी करून बेड वाफे तयार केले.

बेड तयार करताना त्यामध्ये बेसल डोस भरले, दोन रोपातील अंतर ७ बाय ८ ठेवले. सात महिन्यापर्यंत रोपांना ठिबकद्वारे १९-१९, १२-६१ तसेच कॅल्शियम नायट्रेट अशी खते सोडली. दर पंधरा दिवसाला खते व औषध फवारणी केली. सातव्या महिन्यात प्रत्येक्ष फळ तोडणीला सुरवात झाली.

पहिल्यांदा एक किलोला चांगला दर मिळाला दिवाळीनंतर मात्र काहीसा दर कमी झाला. मात्र पपई हंगाम संपेपर्यंत सरासरी किलोला २५ रुपये दर मिळाला. जगताप यांची सद्या दोन एकर पपई सुरू असून अडीच एकर नवीन पपई रोपांची लागवड केली आहे. एकदा पीक लावल्यानंतर ते तीन वर्षे फळ देते. जगताप यांनी दोन एकरातून वर्षाला ८० टन पपईचे उत्पादन घेतले आहे.

ऊस शेतीला भरमसाठ लागणारे पाणी व खतांचा खर्च पाहता अत्यंत कमी पाणी, पपई हे कमी खते, कमी औषधे तसेच कमी मजुरात हे पीक घेता येते. दर चांगला मिळाला तर शेतकऱ्यांना निश्चितच उभारी देणारे हे पीक मात्र व्हायरस आहे. रोगापासून या पपई पिकाला खूप जपावे लागते. - दिग्विजय जगताप, शेतकरी

अधिक वाचा: बिरोबावाडीच्या रासकरांच्या भगव्या डाळिंबाची नेपाळ, बांगलादेशात हवा

Web Title: Digvijay from Vanewadi stop the sugarcane and cultivated this crop, yielding 80 tons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.