Lokmat Agro >लै भारी > Success Story : अंगठेबहाद्दर महिला शेतकऱ्याने फुलवली ड्रॅगन, खजूर अन् सफरचंदाची शेती, वाचा प्रेरणादायी यशकथा

Success Story : अंगठेबहाद्दर महिला शेतकऱ्याने फुलवली ड्रॅगन, खजूर अन् सफरचंदाची शेती, वाचा प्रेरणादायी यशकथा

Dragan date apples; Modern Farming of Beed's Woman | Success Story : अंगठेबहाद्दर महिला शेतकऱ्याने फुलवली ड्रॅगन, खजूर अन् सफरचंदाची शेती, वाचा प्रेरणादायी यशकथा

Success Story : अंगठेबहाद्दर महिला शेतकऱ्याने फुलवली ड्रॅगन, खजूर अन् सफरचंदाची शेती, वाचा प्रेरणादायी यशकथा

दुष्काळी भागात प्रथमच सफरचंदाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग अंगठेबहाद्दर महिला शेतकरी विजया गंगाधर घुले यांनी केला आहे.

दुष्काळी भागात प्रथमच सफरचंदाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग अंगठेबहाद्दर महिला शेतकरी विजया गंगाधर घुले यांनी केला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नितीन कांबळे

पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकरी निश्चितच प्रगती साधू शकतो याच उत्तम उदाहरण बीड मध्ये बघावयास मिळत आहे. बीडसारख्या दुष्काळी भागात प्रथमच सफरचंदाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग अंगठेबहाद्दर महिला शेतकरी विजया गंगाधर घुले यांनी केला आहे. आष्टी तालुक्यात केळसांगवी या खेडेगावात त्यांनी खजूर, ड्रॅगन व सफरचंद अशा मिश्रफळबागांची शेती यशस्वी करून दाखवली आहे. 

आष्टीपासून सात किलोमीटर अंतरावर केळसांगवी येथील महिला शेतकरी विजया गंगाधर घुले अशिक्षित असल्या तरी त्यांना शेतीचा मोठा अनुभव आहेत. त्यामुळे न खचता गावाकडच्या शेतीची सर्व जबाबदारी त्याच सांभाळतात. त्यांना दहा एकर शेतजमीन असून, त्यातील तीन एकरात २०१६ मध्ये ड्रॅगन फळांची शेती केली आहे. त्यानंतर २०१९ ला खजूर व २०२० ला सफरचंदाची शेती केली.

ड्रॅगन फ्रूट, खजूर शेती केल्यानंतर त्यांनी २०२० साली हिमाचल प्रदेश येथून हरमन (एचआरएम ९९) जातीची उष्ण प्रदेशात येणारी सफरचंदाची रोपे आणून एक एकरात २४० झाडे लावली. ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. रोपे काळजीपूर्वक जोपासली. उष्ण प्रदेशातही सफरचंदाची शेती होऊ शकते, हे त्यांनी यातून दाखवून दिले. या मिश्र फळबाग शेतीसाठी २० लाख रूपये खर्च आला होता, आता प्रतिवर्षी यातून ३० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

मुलांच्या धाडसाला आईने दिले बळ

मी अडाणी आहे. पतीचे छत्र हरवल्यानंतर प्रपंच व शेतीची जबाबदारी माझ्यावरच पडली. मुलांनी आधुनिक शेतीचे धाडस केले. ही शेती यशस्वी करण्यास मी भक्कमपणे उभी राहिले. आज आमच्या शेतीची पाहणी करण्यासाठी दूरवरून शेतकरी येतात. छाटणी, फवारणीसह इतर कामेदेखील मीच करते. शासनाने माझ्या मेहनतीची व जिद्दीची दखल घेत जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर केल्याचा मोठा आनंद झाल्याचे विजया गंगाधर घुले यांनी 'लोकमत' जवळ व्यक्त केले. 

शेतीसोबतच मुलांना घडविले

विशेष म्हणजे विजया घुले यांच्या पतीचे २००६ साली निधन झाल्यानंतर दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. एक मुलगा पुण्यात इंजिनीअर, तर दुसरा मुलगा येवला (नाशिक) येथे शिक्षक आहे. आई वडील ही दुहेरी भूमिका विजया यांनी आपल्या आयुष्यात लीलया पार पाडल्याचे त्यांची मुले सांगतात. 

Web Title: Dragan date apples; Modern Farming of Beed's Woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.