Lokmat Agro >लै भारी > Dragon Fruit Cultivation Success Story : सेंद्रिय ड्रॅगनफ्रूटचा गोडवा न्यारा

Dragon Fruit Cultivation Success Story : सेंद्रिय ड्रॅगनफ्रूटचा गोडवा न्यारा

Dragon Fruit Cultivation Success Story : The sweetness of organic dragon fruit | Dragon Fruit Cultivation Success Story : सेंद्रिय ड्रॅगनफ्रूटचा गोडवा न्यारा

Dragon Fruit Cultivation Success Story : सेंद्रिय ड्रॅगनफ्रूटचा गोडवा न्यारा

Dragon Fruit Cultivation Success Story : शेतकरी आता पारंपरिक पिकांना फाटा देत नवं नवीन शेतीमध्ये प्रयोग करत असतात. तसेच एक प्रयोग शिवानंद जटाळे यांनी कसे यश मिळावे ते जाणून घेऊया.

Dragon Fruit Cultivation Success Story : शेतकरी आता पारंपरिक पिकांना फाटा देत नवं नवीन शेतीमध्ये प्रयोग करत असतात. तसेच एक प्रयोग शिवानंद जटाळे यांनी कसे यश मिळावे ते जाणून घेऊया.

शेअर :

Join us
Join usNext

Dragon Fruit Cultivation Success Story :

इस्माईल जहागीरदार

रासायनिक खते देऊन जास्त उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. यात आनावश्यक पैसे खर्च होतात ही बाब लक्षात घेऊन महमदपूरवाडी येथील शेतकरी शिवानंद जटाळे यांनी आपल्या दहा गुंठे शेतात सेंद्रिय पध्दतीने ड्रॅगनफ्रुटची शेती करत आहेत. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्याने अनाठायी खर्चाला फाटा देऊन त्यांनी लाखाचे उत्पन्न् घेतले आहे. पाहुया त्यांच्या यशाचे गमक.  वसमत तालुक्यातील महमदपूरवाडी येथील शेतकऱ्याने १० गुंठे जमिनीत ड्रॅगनफ्रूटची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले. अनाठायी खर्च न करता सेंद्रिय पद्धतीने शेती करत इतर शेतकऱ्यांना एक प्रकारे प्रेरणाच दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील इतरही शेतकरी ड्रॅगनफ्रूट शेतीकडे वळू लागले आहेत.

तालुक्यातील महमदपूरवाडी येथील शेतकरी शिवानंद जटाळे यांनी आपल्या शेतातील १० गुंठे जमिनीत गेल्यावर्षी ड्रॅगनफ्रूटची लागवड केली. यासाठी त्यांनी कृषी कृषी विभागाचा सल्ला घेऊन सेंद्रिय खत देणे सुरू केले. त्यानंतर त्यांचे ड्रॅगनफ्रूट बहरून आले आणि ते आनंदी झाले. 

वर्षातून दोनवेळेस झाडास फळे येत असून इतर खर्चही काही लागत नाही, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. एका झाडास जवळपास ५० फळे लागत असून एका फळाचे वजन १५० ते २०० ग्रॅमपर्यंत असते. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जास्त बहार लागतो. ड्रॅगनफ्रूटची शेती करत जास्तीचे उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी प्रयत्न केला जातो. 
रासायनिक खते हे फळांसाठी हानिकारक आहेत हे पाहून जटाळे यांनी सेंद्रिय शेती ड्रॅगनफ्रूटला बाजारात मागणी जास्त असल्याचे समजल्यावर त्यांनी त्या नुसार नियोजन केले.
मागच्या काही महिन्यांपासून ड्रॅगनफ्रूटला मागणी वाढली आहे. त्यामुळे इतर पिके घेण्याऐवजी ड्रॅगनफ्रूट घेतले तर घराला थोडा हातभार लागेल आणि नागरिकांनाही ते खायला मिळेल हे पाहून लागवड केली. सद्यःस्थितीत ड्रॅगनफ्रूटला २०० रुपये प्रतिकिलोंचा भाव मिळत आहे. जटाळे यांची प्रेरणा घेऊन तालुक्यातील इतरही शेतकरी ड्रॅगनफ्रूटची शेतीकडे वळू लागले आहेत.

पद्धतीने ड्रॅगनफ्रूटची शेती वर्षभरापासून करू लागले आहेत. इतर पिकांना वेळोवेळी फवारणी करावी लागते, विविध प्रकारची खते टाकावी लागतात; परंतु तरीही उत्पन्न काही म्हणावे तेवढे होत नाही. त्यामुळे आपण सेंद्रिय खताचा वापर करून त्यांनी ड्रॅगनफ्रुटची लागवड केली.  

वर्षाकाठी मिळते सव्वा ते दीड लाखाचे उत्पन्न

सेंद्रिय शेतीपद्धतीने ड्रॅगनफ्रूटचे उत्पन्न घेतो. झाडाची वाढ होण्यासाठी व फळधारणा होण्यासाठी पाच ते सहा किलो शेणखत टाकले जाते. त्यानंतर सकाळ, सायंकाळी वेळेनुसार पाणी दिले जाते. लागवड करताना झाडांना लावण्यासाठी सिमेंट पोल व त्यावर जाळीची आवश्यकता असल्यामुळे त्याचाही वापर केला जातो. याशिवाय कोणताही खर्च लागत नाही. जवळपास चाळीस वर्षे हे झाड उत्पन्न देते. ड्रॅगनफ्रूट शेती उत्पन्नास हातभार लावणारी आहे.
- शिवानंद जटाळे, शेतकरी, महमदपूरवाडी

Web Title: Dragon Fruit Cultivation Success Story : The sweetness of organic dragon fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.