महेश देसाई
कवठेमहांकाळ : दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुण निवास तानाजी पाटील या शेतकऱ्याने १४ गुंठ्यांत पाच लाखांचे आल्याचे उत्पादन घेतले आहे. दुष्काळी भागात आल्याचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गापासून अवघ्या तीन किलोमीटरवर खरशिंगला द्राक्षबागांचे सर्वाधिक क्षेत्र आहे. नैसर्गिक संकटामुळे द्राक्ष शेती अडचणीत आहे. निसर्गावर मात करून द्राक्षाचे चांगले उत्पादन घेतले तर त्याला दर चांगला मिळत नाही.
यामुळे द्राक्ष बागायतदार आर्थिक अडचणीत आहे. द्राक्ष शेतीला पर्याय शोधत अनेक प्रयोग शेतकरी करत आहेत. असेच प्रयोगशील शेतकरी निवास पाटील यांचीही नेहमी शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी धडपड असते. त्यातूनच त्यांनी आल्याचे पीक घेण्याचा निर्णय घेतला.
निवास पाटील व त्यांच्या पत्नी आले पीक घेण्यास सुरुवात केली. आले पिकेल की नाही, दर मिळणार की नाही, याची कसलीही शाश्वती नसतानाही त्यांनी धाडसाने आले लागवड केली.
गत पाच वर्षांपासून हे युवा दाम्पत्य शेतकरी आले पीक घेत निर्मला पाटील यांनी २०१९ पासून असताना बाजारात त्यांना अपेक्षित दर मिळाला नाही. मात्र त्यांनी निराश न होता.
यावर्षी आत्मविश्वासाच्या जोरावर १४ गुंठ्यांतील आल्यापासून पाच लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. आल्यातील यशस्वी प्रयोगामुळे निवास पाटील यांना शेतीमधील नवीन प्रयोग करण्याची ऊर्जाच मिळाली आहे.
सध्या पाच वर्षापासून आम्ही आले पीक घेत आहोत. गावात द्राक्षबागांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आमची ही द्राक्षबाग आहे. शेतीमध्ये नवीन काहीतरी प्रयोग करावा या उद्देशाने आले लागवड केली. या पिकामुळे वेगळी ओळख निर्माण झाली असून यंदा १४ गुंठ्यांत पाच लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. - निवास पाटील, शेतकरी, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ