Join us

बाळासाहेब यांनी ३९ गुंठ्यांत ९४ टन ऊस उत्पादन कसे घेतले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 11:24 AM

आष्टा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भूपाल घसघसे यांनी ३९ गुंठ्यात ९४ टन इतके विक्रमी ऊस उत्पादन घेतले. बाळासाहेब घसघसे यांची आष्टा दुधगाव मार्गावर खडकाळ जमीन आहे या जमिनीत घसघसे यांनी जून २०२२ मध्ये उभी आडवी नांगरट करून चार फूट सरीवर को ८६०३२ या उसाची लागवड केली.

सुरेंद्र शिराळकरआष्टा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भूपाल घसघसे यांनी ३९ गुंठ्यात ९४ टन इतके विक्रमी ऊस उत्पादन घेतले. बाळासाहेब घसघसे यांची आष्टा दुधगाव मार्गावर खडकाळ जमीन आहे या जमिनीत घसघसे यांनी जून २०२२ मध्ये उभी आडवी नांगरट करून चार फूट सरीवर को ८६०३२ या उसाची लागवड केली.

या ऊसाला लागण बाळ भरणी वेळी तसेच भरणी व पावसाळ्यात सेंद्रिय व रासायनिक खतांचा चंद्रप्रभनाथ सोसायटीचे खत अधिकारी शशिकांत वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी लागवड दिली तसेच ठिबकने नियमित व योग्य पद्धतीने पाणी दिले हा ऊस वसंतदादा सहकारी साखर कारखाना दत्त इंडियाला पाठवण्यात आला या उसाचे विक्रमी ९४ टन वजन मिळाले यातून त्यांना एकूण दोन लाख ९५ हजार ५३९ रुपये बिल मिळाले.

बाळासाहेब घसघसे यांनी आज अखेर शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले मात्र त्यांना यश मिळाले नाही यावर्षी मात्र हवामान पाणी व योग्य नियोजनामुळे त्यांना विक्रमी उत्पादन घेता आले याबद्दल परिसरातील शेतकऱ्यासह कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :ऊसशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनखतेपीक