मयूर तांबडेनवीन पनवेल गुळसुंदे येथील प्रगतिशील शेतकरी, कृषीभूषण मिनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतामध्ये पर्पल राइस म्हणजेच इंडोनेशियातील थायोमल्ली जस्मीन राइसची लागवड केली आहे. हा तांदूळ विशेषतः लहान मुलांसाठी उपयुक्त आहे.
गाडगीळ यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग करून आत्तापर्यंत अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने घेतलेली आहेत. ज्यामध्ये ड्रॅगनफ्रूट, स्ट्रॉबेरी, लाल तांदूळ, काळा तांदूळ, बासमती, आंबेमोहर, डायबेटिससाठीचा आरएनआर तांदूळ, कलर कलिंगड व मस्कमेलन इत्यादींचा त्यात समावेश आहे.
आपल्याकडे यशस्वी झालेले उत्पादन इतरही परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावे, यासाठी त्यांचा सतत प्रयत्न चालू असतो. जेणेकरून पारंपरिक पिकांबरोबर नावीन्यपूर्ण उत्पादने घेतल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असा त्यांचा विश्वास आहे.
रायगड जिल्ह्यात मुख्यत्वेकरून भात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. साधारण जया, रत्ना, कोलम अशा प्रकारचे भात उत्पादन होते व त्यापासून तांदूळ काढला जातो. विशेष करून आपल्या परिसरातील आहाराचा विचार करणे म्हणजे भात, भाकरी, पोहे, घावण इत्यादींच्या गरजेनुसार हा तांदूळ पिकवला जात होता.
यामध्ये विक्री करून व्यापारिक दृष्टिकोन नसल्याने वरील भाताच्या जाती परिसरात काढल्या जात होत्या. जेणेकरून आपल्या कुटुंबाची गरज भागवली जाईल, परंतु औद्योगिकरणामुळे निर्माण झालेली आजूबाजूची विकसित शहरे व मागणी यांचा विचार केल्यास नावीन्यपूर्ण कृषिमाल तयार करणे ही काळाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
बियाणे तयार करणारहा तांदूळ हा कोकणात पहिल्यांदाच घेतला गेला असून पीक तयार झाल्यानंतर या तांदळाच्या जातीचे बियाणे तयार करून ते आजूबाजूच्या परिसरातील शेतकयांना आपण उपलब्ध करून देऊ असा आशावाद मिनेश गाडगीळ यांनी व्यक्त केला.
नैसर्गिक पिग्मेंटमुळे येणाऱ्या रंगाला ग्राहकांची पसंतीसाधारण ३० ते ४० विचेटल एकरी उत्पादन देणाऱ्या या जाती असून अनेक गुणधर्म या तांदळात आढळून येतात. ज्यामध्ये कमी ग्लॅयसेमिक इन्डेक्स, अॅन्टी ऑक्सिडन्ट इफेक्ट, अॅन्टी कॅन्सर इफेक्ट, विशेष प्रकारचा सुवास, शिजण्यासाठी कमी कालावधी इत्यादी व नैसर्गिक पिग्मेंटमुळे येणाऱ्या विविध रंगामुळे ग्राहकांची यास विशेष पसंती असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच आरोग्यासाठी हितकारक असल्याने मागणीही आहे.
अधिक वाचा: उसात १६ प्रकारची आंतरपीक घेत मच्छिंद्रराव कशी करताहेत नफ्याची शेती? वाचा ही यशोगाथा