Lokmat Agro >लै भारी > Farmer Success Story: अवघ्या अर्ध्या एकरात सुरु केलेली शेती आज सतरा एकर शेतीचा मालक

Farmer Success Story: अवघ्या अर्ध्या एकरात सुरु केलेली शेती आज सतरा एकर शेतीचा मालक

Farmer Success Story: A farm that started with just half an acre today owns a seventeen acre farm | Farmer Success Story: अवघ्या अर्ध्या एकरात सुरु केलेली शेती आज सतरा एकर शेतीचा मालक

Farmer Success Story: अवघ्या अर्ध्या एकरात सुरु केलेली शेती आज सतरा एकर शेतीचा मालक

देशातील प्रमुख मोठ्या बाजारपेठेत याने एवढी पत निर्माण केली आहे की, यांच्या मालाला चांगलाच दर मिळत असतो. ही यशोगाथा आहे अनुभवातून शहाणे झालेले नागठाणे येथील शेतकरी मनोहर साळुंखे यांची.

देशातील प्रमुख मोठ्या बाजारपेठेत याने एवढी पत निर्माण केली आहे की, यांच्या मालाला चांगलाच दर मिळत असतो. ही यशोगाथा आहे अनुभवातून शहाणे झालेले नागठाणे येथील शेतकरी मनोहर साळुंखे यांची.

शेअर :

Join us
Join usNext

जगदीश कोष्टी
आईवडील पारंपरिक पद्धतीने करत ते पाहावत नसे. काही सांगायला गेलं तर त्यांना पटत नव्हतं. यातूनच हट्ट करून अवधी अर्धा एकर शेती करण्यास घेतली. विविध प्रयोग केले. यातून हा शेतकरी सतरा एकर शेतीचा मालक आहे.

देशातील प्रमुख मोठ्या बाजारपेठेत याने एवढी पत निर्माण केली आहे की, यांच्या मालाला चांगलाच दर मिळत असतो. ही यशोगाथा आहे अनुभवातून शहाणे झालेले नागठाणे येथील शेतकरी मनोहर साळुंखे यांची.

नागठाणे येथील मनोहर साळुंखे यांचे शिक्षण विज्ञान शाखेतील बारावीपर्यंत झालेले, वडील १९८० मध्ये वेगळे झाले. वाटणीत त्यांना दोन एकर शेती मिळाली. त्यात ते घरी खाण्यापुरती शेती करत. काबाडकष्ट करत. पण पैसे खेळत नव्हते.

हा प्रकार मनोहर साळुंखे यांना आवडत नव्हता. चांगले उत्पादन देणारी पिके घ्यायला पाहिजे असे वाटे. ते आईवडिलांना सांगतही; पण ते आईवडिलांना पटत नव्हते. शेवटी हट्ट करून अर्धा एकर शेती ताब्यात घेतली अन् नवा प्रवास सुरू झाला, अर्धा एकर शेतात मेथी, कोथिंबीर, तांदळीचे उत्पादन घेतले. माल घेऊन तै साताऱ्यात विक्रीस येत.

पैसे मिळू लागले त्यातून पुढे कोबीचे उत्पादन घेतले. उंब्रज, सातारा, नागठाणे येथील बाजारात ते माल घालू लागले. त्यातून सात हजार रुपये मिळाले, ते आईवडिलांना दिले, तेव्हा त्यांचा यांच्या शेतीवर विश्वास बसला.

दरम्यान, भाऊ फलटण तालुक्यात वीज वितरण कंपनीत नोकरीस होते. त्यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. त्यातून साळुंखे यांनी द्राक्षांची बाग घेतली. यात पहिल्या वर्षी फार नफा झाला नाही. 

पण हार न मानता झालेल्या चुका सुधारल्या, त्यामुळे चांगले उत्पादन मिळाले. पण कर्ज वाढत गेले, मग स्वतःची कूपनलिका घेतली अन् द्राक्षांचे चांगले उत्पादन घेतले, त्यातून कर्ज फिटले, पण यापुढे पैसे मिळविण्यासाठी वर्षभर थांबावे लागणार होते.

त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की दररोज पैसे देणारी पिकंही हवीत. म्हणून पुन्हा भाजीपाला उत्पादन घेऊ लागले चांगल्या गुणवत्तेची पण विविधता आणण्याचा प्रयत्न केला. ते सध्या विविध जातीच्या पेरूचे उत्पादन घेत आहेत. त्यांना देश-विदेशात उत्पादन मिळत आहे.

साळुंखे हे सच्या सतरा एकर शेती करत असून, त्यातून लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. याच कालात त्यांनी फळे, फुले उत्पादक संस्था स्थापन केली त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

अनुभवातून बनविले ठिबक
साइखे यांना लक्षात आले की, पाण्याशिवाय शेती अवघड आहे. फूपनलिका घेतली. त्यातून दोन इथी मोटार चालत होती: पण हे पाणी पुरेसे नव्हते. म्हणून कमी पाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला, पण तेव्हा ठिबकबाबत फारशी कोणालाच माहिती नव्हती. म्हणून दोन इथीला लहान-लहान आकारातील पाइप जोडून गरम तारांनी छिंट पाहून ठिबक यत्रणा स्वतःच तयार केली.

२५ शेतकऱ्यांना केले एकत्र
शेतात प्रयोग करत असताना मनोहर साळुंखे यांनी इतरांनाही सोबत घेतले. टोमॅटोला घांगली गागणी आहे, हे लक्षात आल्यावर २५ एकरात उत्पादन घेतले. यासाठी २५ शेतकऱ्याना एकत्र केले. सर्व कामे एकत्र करत. त्यामुळे सर्वांनाच फायदा झाला. साळुंखे याच्याकडे सध्या चाळीस कामगार असून, बाहेरपेक्षा त्यांच्याकडे जादा मजुरी दिली जाते.

अधिक वाचा: Young Farmer Success Story: टोमॅटो पिकामध्ये एकरी ३९ टनाचे विक्रमी उत्पादन घेत रणजितने कमविले तब्बल १५ लाख

Web Title: Farmer Success Story: A farm that started with just half an acre today owns a seventeen acre farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.