नितीन कांबळे
कडा : आष्टी तसा दुष्काळी तालुका, कधी कमी, तर कधी जास्त पाऊसrain. त्यातच शेतात काय करावे, हा प्रश्न कठीण असताना शेती करण्याचा निश्चय उराशी बाळगून शेतकऱ्याने दीड एकर शेतात आवळा शेतीचा यशस्वी प्रयोग केला. त्यासाठी एकदाच ५० हजाराचा खर्च आला, तर १५ वर्षांत आजवर १२ लाख कमवित प्रगतशील शेतकरी दीपक सोनवणे याने प्रगती साधली आहे.
दीपक सोनवणे इतरांपेक्षा वेगळी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी दीपक सोनवणे यांनी अठरा वर्षांपूर्वी वेगळ्या पध्दतीने शेती करण्याचा मानस केला. आवळाamala ही आयुर्वेदिक शेती असल्याने यावर कसलाच रोग पडत नसल्याने फवारणी करावी लागत नाही. त्यामुळे आवळा शेती कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारी मानले जाते.
पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची आवळा शेती पाहून तीच प्रेरणा घेत दीपक सोनवणे यांनी २००६-०७ मध्ये २०० रोपे आणली. २० २० पध्दतीने दीड एकरात लागवड केली. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे १३० झाडे जळून गेली. फक्त ७० झाडे साधली. या ७० झाडाचे वर्षाकाठी ८० ते ९० हजार रुपये उत्पन्न मिळते.
कडा व अहिल्यानगर येथील बाजारपेठेत ३० ते ४० रुपये किलोचा भाव मिळतो. या एक एकरात ठिबक, रोपे, लागवडीसाठी ५० हजार रुपये खर्च आला. पण, मेहनत, चिकाटी व सातत्य ठेवल्याने पत्नी उज्ज्वला हिच्या साथीने १५ वर्षात १२ लाख रुपये उत्पन्न मिळाल्याने शेतीने उभारी दिल्याचे शेतकरी सोनवणे यांनी 'लोकमत ऍग्रो'ला सांगितले.
आधुनिक शेतीला महत्त्व, तर घरात पैसा
पारंपरिक पध्दतीने शेती करताना अडचण निर्माण होते. शिवाय खर्च जास्त आणि उत्पन्न कमी मिळते. पण, आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाल्याने आधुनिक पध्दतीने शेती केली तर घरात पैसा येतो आणि कुटुंबाला उभारी मिळत असल्याचे प्रगतशील शेतकरी उज्ज्वला सोनवणे यांनी 'लोकमत ऍग्रो'ला सांगितले.
आवळा आरोग्यदायी■ आवळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. आयुर्वेदातही आवळा खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम आढळते.
■ हे घटक केसांसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर सिद्ध होतात.
■ रोज रिकाम्या पोटी आवळा खाणे किंवा त्याचा रस प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात, असे आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाल्हेकर यांनी सांगितले.हे ही वाचा सविस्तर : Cotton : मराठवाड्यातील कोरडवाहू जमिनीतील कापसाचे उत्पन्न 'या' तरूणाने ३ पटीने कसे वाढवले