Lokmat Agro >लै भारी > Farmer Success Story: जगन्नाथरावांनी झुकिनी पिकात केली कमाल दीड एकरात दहा टनाचे विक्रमी उत्पादन

Farmer Success Story: जगन्नाथरावांनी झुकिनी पिकात केली कमाल दीड एकरात दहा टनाचे विक्रमी उत्पादन

Farmer Success Story: Jagannatrao achieved a record production of ten tons one and a half acre in zucchini crop | Farmer Success Story: जगन्नाथरावांनी झुकिनी पिकात केली कमाल दीड एकरात दहा टनाचे विक्रमी उत्पादन

Farmer Success Story: जगन्नाथरावांनी झुकिनी पिकात केली कमाल दीड एकरात दहा टनाचे विक्रमी उत्पादन

सोनहिरा परिसरातील शेतकरी शेतामध्ये नवनवीन पिके घेऊन नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. झुकिनी हे भाजीपाला वर्गातील अत्यंत कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात उत्पन्न देऊन जाणारे पीक आहे.

सोनहिरा परिसरातील शेतकरी शेतामध्ये नवनवीन पिके घेऊन नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. झुकिनी हे भाजीपाला वर्गातील अत्यंत कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात उत्पन्न देऊन जाणारे पीक आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अतुल जाधव
देवराष्ट्रे: सोनहिरा परिसरातील शेतकरी शेतामध्ये नवनवीन पिके घेऊन नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. झुकिनी हे भाजीपाला वर्गातील अत्यंत कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात उत्पन्न देऊन जाणारे पीक आहे.

देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील शेतकरी जगन्नाथ महादेव मोरे यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये झुकिनी पिकाची लागवड केली. त्यांनी दोन महिन्यांमध्ये तब्बल दहा टनाचे उत्पादन घेऊन सात लाख रुपये नफा मिळवला आहे.

झुकिनी हे पीक भाजीपाला वर्गात मोडते. याची लागवड केल्यानंतर एकाच महिन्यात फळ चालू होते व दोन महिन्यांत त्याचा भर निघून जातो त्यामुळे या पिकाचा कालावधी फक्त लागणीपासून दोन महिन्यांचाच असतो.

मोरे यांनी दीड एकर क्षेत्रात बेड तयार करून त्या बेडवरती मल्चिंग पेपर अंथरून एक फूट अंतरावर झुकिनी मधील वेलकम क्लोज या जातीच्या पिकाची लागवड केली. ठिबकद्वारे या पिकाला लागवड व आळवणी दिली तसेच फवारणीद्वारे योग्य औषधं देण्यात आली एक महिनाभरात या झुकिनी पिकापासून उत्पन्नाला सुरुवात झाली.

या एका महिन्यातून या पिकातून तब्बल दहा टन उत्पादन काढले. या पिकाचा दररोज तोडा करावा लागतो. या पिकाला मुंबई येथे चांगले मार्केट असल्यामुळे येथील मालाची दररोज तोडणी करून तो माल मुंबईला मार्केटला पाठवला जातो.

मुंबईमध्ये सरासरी ७० ते १०० रुपये किलो या दराने या झुकिनी पिकाची विक्री होते यातून या शेतकऱ्याला सात लाख रुपयांचा नफा मिळाला. भाजीपाला करण्यात हातखंडा असलेले जगन्नाथ मोरे आलटून पालटून नेहमी झुकिनी पीक शेतामध्ये घेत असतात त्यामुळे त्यांना झुकिनी या पिकात चांगल्या प्रकारे दरवर्षी नफा मिलन देत आहे.

बाजारपेठेचा अचूक अंदाज
जगन्नाथ मोरे हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये झुकिनी हे पीक आलटून पालटून घेत असतात त्यामुळे त्यांना मुंबई येथील मार्केटचा चांगला अंदाज आला आहे त्यामुळे कोणत्या वेळेला नफा मिळेल त्यावेळेला ते चांगल्या प्रकारे लागवड करून नफा मिळवत असतात. यांचे अनेक शेतकरी अनुकरणही करू लागले आहेत.

झुकिनी पिकाचा कालावधी कमी असल्यामुळे यासाठी होणारा आर्थिक खर्चही कमी प्रमाणात असतो; पण फळ वजनदार असल्यामुळे यातून मिळणारा नफा हा अधिकच राहतो असे जगन्नाथ मोरे यांनी सांगितले.

अधिक वाचा: Farmer Success Story: शेतकरी विठ्ठल कोळी करता आहेत एकरी पाच लाख उत्पन्नाची ऊस शेती वाचा सविस्तर

Web Title: Farmer Success Story: Jagannatrao achieved a record production of ten tons one and a half acre in zucchini crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.