गजानन मोहोड
अमरावती : मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील आयटी इंजिनिअर (IT Engineer) तरुणाने नोकरीच्या मागे न धावता नवतंत्रज्ञानाच्या (New Technology) साहाय्याने शेतीची (Agriculture) कास धरली आहे.
याद्वारे अडीच कोटींचे उत्पन्न मिळवीत असून जम्मू-कश्मीर (Jammu and Kashmir) ते केरळपर्यंत (Kerala) तेथील फळे व भाजीपाला विक्रीसाठी जात आहेत.
शिवाय परिसरातील २०० वर युवकांना त्याने रोजगार उपलब्ध केलेला आहे. विशेष म्हणजे हाताद्वारे फुलांचे परागीकरण करून तो जंबो फळांचे उत्पादन घेत आहे.
मोर्शी तालुक्यातील उदखेड येथे विष्णोरा शिवारात शास्वत प्रफुल्ल मुंधडा यांनी १४० एकर शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग (New experiments) राबविले.
यापैकी १९ एकरांत सीताफळाचा बगिचा (A citron garden) आहे. यामध्ये सहा एकरांत बालानगर, एनएमके गोल्डन, चार एकरात अर्कासहान व तीन एकरात किमान ४०० ग्रॅम वजनाचे फळ असणाऱ्या झाडांची छत्तीसगड येथून लागवड केली.
आठ एकरात जंबो पेरू बीही १ वाण, तीन एकरात तैवान पिंक या वाणाची लागवड केली. पेरूला तीन प्रकारचे कव्हर लावण्यात येतात. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत नाही.
शिवाय ३९ एकरांत छत्तीसगड येथून जंगली खुंटावर वाढविलेल्या वांगीची लागवड केली. ही सर्व उत्पादने देशभर विक्रीसाठी पाठविल्या जातात.
यामध्ये पेरू प्रामुख्याने केरळमध्ये, पपई जम्मू, जयपूर, बरेली तर वांगीची ओडिशा, एमपीत विक्रीसाठी जातात. ते आय टी इंजिनिअर (मुंबई), एमबीए (ॲग्रीकल्चर) आहेत.
शेतीला नवतंत्राची जोड दिल्याने त्यांना भरघोस उत्पन्न होत आहे. प्रगत शेतीसाठी कृषीतज्ज्ञांसह कृषी विभागाचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे.
अडीच कोटींपर्यंत उत्पन्न
या शेतीद्वारे निव्वळ २.५० कोटींपर्यंत उत्पन्न शास्वत मुंधडा मिळवीत आहेत. शिवाय रोज १०० पेक्षा अधिक व पीक काढणीच्या हंगामात २५० वर युवकांना रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे.
२०० वर युवांना मार्गदर्शन
शास्वत मुंधडा या तरुणाने अनेक युवकांना मार्गदर्शन केले. प्रगत शेतीसाठी प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे त्यांना पुरस्कार मिळाळे आहेत.
काय आहे हाताने परागीकरण?
फिमेल स्टेजवरील फुले तोडून रात्रभर सुकण्यास ठेवण्यात येतात व त्यामधील पराग काढून एक सिरिंजद्वारे मेल स्टेजवरील फुलांमध्ये हे पराग लावण्यात येतात. या परागीकरण प्रक्रियेमुळे फळ मोठे व दर्जेदार होते, सकाळी ६ ते ९ या वेळेत परागीकरणाची प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे फळधारणा चांगली व दर्जेदार होते, असे मुंधडा म्हणाले.