Lokmat Agro >लै भारी > Farmer Success Story : आखाती देशांमध्ये मागणी असणाऱ्या ढोबळी मिरचीतून प्रत्येक तोड्याला लाखाची कमाई

Farmer Success Story : आखाती देशांमध्ये मागणी असणाऱ्या ढोबळी मिरचीतून प्रत्येक तोड्याला लाखाची कमाई

Farmer Success Story : Per harvesting earned lakhs of rupees from capsicum which is more demand in the Gulf countries | Farmer Success Story : आखाती देशांमध्ये मागणी असणाऱ्या ढोबळी मिरचीतून प्रत्येक तोड्याला लाखाची कमाई

Farmer Success Story : आखाती देशांमध्ये मागणी असणाऱ्या ढोबळी मिरचीतून प्रत्येक तोड्याला लाखाची कमाई

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील प्रगतशील शेतकरी केरभाऊ बाबूराव चासकर यांनी आपल्या शेतात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संकरित ढोबळी मिरचीच्या जातीची लागवड केली.

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील प्रगतशील शेतकरी केरभाऊ बाबूराव चासकर यांनी आपल्या शेतात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संकरित ढोबळी मिरचीच्या जातीची लागवड केली.

शेअर :

Join us
Join usNext

शेतात ढोबळी मिरचीचा अभिनव प्रयोग करत नागापूर येथील शेतकरी केरभाऊ बाबूराव चासकर यांनी चांगला नफा मिळवला आहे. ढोबळीला दहा किलोस ८०० ते ८५० रुपये असा विक्रमी दर मिळत असल्याने एका तोड्याला लाखो रुपयांचे उत्पादन मिळविले आहे.

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील प्रगतशील शेतकरी केरभाऊ बाबूराव चासकर यांनी आपल्या शेतात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संकरित ढोबळी मिरचीच्या जातीची लागवड केली.

प्रतिकूल वातावरणामध्येसुद्धा ढगफुटीसदृश पाऊस तसेच सतत महिनाभर पडणारा पाऊस व धुके यांचा सामना करत दर दोन ते तीन दिवसांच्या अंतराने सतत फवारण्या करत शेडनेट, पॉलिहाऊसच्या तोडीचा अतिशय उत्कृष्ट प्रतीचा माल पिकविण्यात त्यांना यश आले.

आतापर्यंत चार ते पाच तोड्यांना ८०० ते ८५० रुपयांचा विक्रमी दर मिळून तोड्याला एक लाख रुपयांचे उत्पन्न ते घेत आहेत. ढोबळी मिरचीचे वैशिष्ट्य म्हणजे सरासरी एका मिरचीचे वजन ६० ते ८० ग्रॅम इतके भरते. त्यामुळे या मिरचीला बाजारात चांगली मागणी असते.

तसेच या मिरचीच्या झाडाला फुटवेही चांगले निघत असतात. अजूनही चार ते पाच तोडे होण्याची त्यांना खात्री आहे. जमीन मशागत, शेणखत चार ट्रॉली, खत, रासायनिक खते, औषधे मल्चिंग पेपर याप्रमाणे शेतामध्ये लागवड केली.

हे पीक घेण्यासाठी केरभाऊ बाबूराव चासकर गुरुजी यांना त्यांची पत्नी शकुंतला, मुलगा कालिदास, राजेंद्र तसेच विजय व सूनबाई सुनीता, शैला, पूनम यांचे सहकार्य लाभले.

ढोबळी पीक नक्कीच फायदेशीर आहे अशी प्रतिक्रिया चासकर यांनी दिली आहे. ढोबळी स्थानिक बाजारात विक्रीसाठी नेत असल्याने वाहतूक खर्चात बचत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आखाती देशांमध्ये निर्यातीस वाव
■ 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे. उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यास बाजारभाव चांगला मिळतो. त्यामध्ये ढोबळी मिरचीस तर वर्षभर जास्तीत जास्त चांगले बाजारभाव मिळतात. ही मिरची भारतामधून आखाती देशांमध्ये निर्यात केली जाते.
■ मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आखाती देशांमध्ये निर्यात केली जाते, मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आखाती देशांमध्ये निर्यातीस आणखी भरपूर याव आहे.

अधिक वाचा: Jaminiche Bakshish Patra : जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय? आणि ते का करायचे वाचा सविस्तर

Web Title: Farmer Success Story : Per harvesting earned lakhs of rupees from capsicum which is more demand in the Gulf countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.