Lokmat Agro >लै भारी > Farmer Success Story : मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतीला सेंद्रिय जोड देत आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याची वाचा यशकथा

Farmer Success Story : मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतीला सेंद्रिय जोड देत आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याची वाचा यशकथा

Farmer Success Story : Read the success story of a farmer who enriches the dryland agriculture of Marathwada with modern technology by adding organic matter | Farmer Success Story : मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतीला सेंद्रिय जोड देत आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याची वाचा यशकथा

Farmer Success Story : मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतीला सेंद्रिय जोड देत आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याची वाचा यशकथा

जमिनीचे आरोग्य राखत, पाणी नियोजन (water management) सह आधुनिक सिंचन व्यवस्था (irrigation) आखत रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीला सेंद्रिय खतांची (organic manure) जोड देत नालेगाव येथील बाबासाहेब व देविदास आज परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत अधिक उत्पादनाची शेती करत आहे. 

जमिनीचे आरोग्य राखत, पाणी नियोजन (water management) सह आधुनिक सिंचन व्यवस्था (irrigation) आखत रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीला सेंद्रिय खतांची (organic manure) जोड देत नालेगाव येथील बाबासाहेब व देविदास आज परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत अधिक उत्पादनाची शेती करत आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

जमिनीचे आरोग्य राखत, पाणी नियोजन सह आधुनिक सिंचन व्यवस्था आखत रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीला सेंद्रिय खतांची जोड देत नालेगाव येथील बाबासाहेब व देविदास आज परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत अधिक उत्पादनाची शेती करत आहे. 

कोरडवाहू भागातील छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील बाबासाहेब व देविदास एकनाथ गायकवाड यांना वडिलोपार्जित ५० एकर शेती. मात्र अल्प सिंचन व्यवस्था, मजुरांची वारंवार भासणारी कमतरता, अधिक खर्चासह कमी उत्पादन आदी विविध समस्येपुढे गायकवाड बंधू हतबल झाले होते. ज्यातून मार्ग शोधण्यासाठी त्यांनी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृविकें, आदींच्या भेटी घेतल्या नवनवीन तंत्रज्ञान समजून घेतले आणि गेल्या ७ ते ८ वर्षांपासून आता ते फायद्याची शेती करत आहे. 

देविदास, बाबासाहेब गायकवाड परिवार
देविदास, बाबासाहेब गायकवाड परिवार

ज्यात रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर देखील बाबासाहेब यांनी वाढविला आहे. तसेच वेळोवेळी विहरीतील पाणी पातळीची नोंद घेणे, प्रजन्यमापक द्वारे पावसाची नोंद, मुक्त संचार व्यवस्थेसह देशी व संकरीत जनावरांचा गोठा, अत्याधुनिक शेती अवजारांसाठी घरीच वेल्डिंग वर्कशॉप आदी सर्वांच्या मदतीने बाबासाहेब व बंधु देविदास शेती करत आहे.

लाल - उन्हाळी कांदा, कपाशी, मका, टोमॅटो, अद्रक, ज्वारी, बाजरी, मुग, भुईमुग आदी पिके गायकवाड बंधु घेतात तर यासोबत एक हेक्टर बांबू लागवड देखील त्यांनी केली आहे. पारंपारिक पिके घेताना त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अवजारे तयार करून त्या द्वारे पिकांची लागवड पेरणी केली जाते. सोबत बारामाही पाणी उपलब्धते करिता  १ व १.५ एकर असे दोन शेततले देखील त्यांनी केले आहे.

गोठयातून शेतीला समृद्धी

बाबासाहेब यांच्याकडे सध्या चार बैल, दोन म्हैस, दोन एच एफ गाई, तीन शेळ्या, चार गीर गाई असून याकरिता त्यांनी मुक्त संचार गोठा केला आहे. तसेच चारा खाण्याच्या शेड मधील गोमूत्र व शेण बाहेर एका ताडपत्रीचे आच्छादन केलेल्या खड्ड्यात जाईल अशी व्यवस्था केली आहे. जिथून फिल्टर होऊन पंपच्या मदतीने ठिबकद्वारे हे द्रावण शेतात पीकांना दिले जाते. 

पावसाची व विहीरीतील पाण्याची नोंद

पावसाळ्यात बाबासाहेब दैनंदिन घरावर ठेवलेल्या प्रजन्यमापकाद्वारे नोंद घेत झालेल्या पावसाची नोंद घेतात. तसेच विहरीतील पाणी पातळीची देखील नोंद ठेवातात. ज्यामुळे उन्हाळी हंगामात पिकांची निवड करणे, व्यवस्थापन करणे सोपे जात असल्याचे बाबासाहेब सांगतात. 

 पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे 

पारंपारिक शेतीला आता आधुनिकतेची जोड देत शेतीत नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे. तेव्हाच शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. - बाबासाहेब गायकवाड.

हेही वाचा -  Amla Proccesing Success Story : पारंपारिक शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देत उभा केला 'कानडे अ‍ॅग्रो आवळा उत्पादनाचा ब्रॅंड'

Web Title: Farmer Success Story : Read the success story of a farmer who enriches the dryland agriculture of Marathwada with modern technology by adding organic matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.